कोरोनानं पुन्हा अमेरिकेचं कंबरडं मोडलं, रोज 1 लाख नवे रुग्ण, शवागृहात मृतदेहांचा खच, जग पुन्हा दहशतीत

शनिवारी अमेरिकेत 1 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 91 लाख 54 हजार 269 वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत 6 लाख 37 हजार 314 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनानं पुन्हा अमेरिकेचं कंबरडं मोडलं, रोज 1 लाख नवे रुग्ण, शवागृहात मृतदेहांचा खच, जग पुन्हा दहशतीत
CORONA
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 12:50 PM

न्यूयार्क: कोरोना विषाणू संसर्गानं अमेरिकेचे कंबरड मोडलं आहे. अमेरिकेत दिवसाला 1 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसात 1 लाख ते दीड लाखांच्या सरासरीनं रुग्ण वाढ होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील कोरोनाचा विस्फोट संपूर्ण जगासाठी चिंता वाढवणारा आहे. अमेरिकेत सध्या 1 लाखां८हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

अमेरिका कोरोना अपडेट (29 ऑगस्ट):

नवीन कोरोनाबाधित: 100947 सरासरी : 159770 रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या: 100789 अतिदक्षता विभागात उपचार सुरु : 25552 रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी: 683

अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

शनिवारी अमेरिकेत 1 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 91 लाख 54 हजार 269 वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत 6 लाख 37 हजार 314 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या सात दिवसात अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 टक्के वाढ दिसून आली आहे. तर, मृतांच्या संख्येत 28 टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेतील हे चित्र नक्कीच जगाचं टेन्शन वाढवणार आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असलं तरी वाढती रुग्णसंख्या संपूर्ण जगाासाठी चिंतेंचं ठरलं आहे.

जानेवारी नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर रुग्ण

अमेरिकेत जानेवारी 2021 नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येनं 1 लाखांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक रुग्णसंख्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर देखील उपाचाराचा ताण येत आहे.

बाधितांमध्ये लस न घेतलेल्यांचं प्रमाण अधिक

कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावार वाढ होत आहे. या संसर्गाचं कारण डेल्टा वेरिएंट सांगितलं जात आहे. मात्र, डॉक्टर आणि संशोधकांचं एक निरीक्षण समोर आलं आहे. कोरोनामुळं रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये कोरोना लस न घेतलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या अधिक असून परिस्थिती खराब असल्याचं देखील एफडीएच्या पॅनेलवरील सदस्यांनी डॉक्टरांनी सांगितलं आहे. जून महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याचंही दिसून आइलं आहे.

संबंधित बातम्या:

देशात तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय? नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर

करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ

US Corona Update more than 1 lakh corona cases recorded in America Hospitals are filled with patients

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.