Vitamin D : शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झालीय ? चुकून ही दुर्लक्ष करू नका ही लक्षणे अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम !

Vitamin D : शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाली आहे की नाही हे काही लक्षणांच्या आधारे आपण सहज ओळखू शकता.

Vitamin D : शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झालीय ? चुकून ही दुर्लक्ष करू नका ही लक्षणे अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम !
Image Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 11:06 PM

व्हिटॅमिन डी (Vitamin D) हे आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनवण्यासाठी आणि दाताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लाभदायक ठरते. शरीरामध्ये व्हिटॅमिन डी चा अभाव निर्माण झाल्याने आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास नेमकी कोणती लक्षणे आपल्याला दिसून येतात याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या सुरुवातीच्या लक्षणांमुळे तुम्हाला भविष्यात औषध उपचार करण्यासाठी मदत होणार आहे. व्हिटॅमिन डी अन्य व्हिटॅमिनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हे एका हार्मोनच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्य करते. शरीरामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम इत्यादीचे शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. सूर्याची किरणे हे व्हिटॅमिन डी चे एक चांगले स्रोत मानले गेले आहे. सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी उपलब्ध असते. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला काही पदार्थांचा समावेश आहारामध्ये (Foods) करणे अत्यंत गरजेचे आहे. अवोकॅडो, चिकन आणि पीनट बटर देखील नेहमी खायला हवे. चला तर मग जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता (vitamin d deficiency) निर्माण झाल्यास नेमके कोण कोणते लक्षणे शरीरावर दिसून येतात त्याबद्दल…

अशक्तपणा

आपल्यापैकी अनेकजण योग्य आहार आणि पूर्ण झोप घेऊन सुद्धा अनेकांना नेहमी अशक्तपणा जाणवत असतो. या अशक्तपणा मागे व्हिटॅमिन डी ची कमतरता हे देखील एक कारण असू शकते. व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यामुळे शरीरात खूप थकवा जाणवू लागतो. बहुतेक वेळा या अशक्तापणाकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, अशातच आपल्याला व्हिटॅमिन डी ने उपयुक्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारामध्ये करायला हवा, असे केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डी ची मात्रा लवकरच वाढेल त्याचबरोबर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायला हवा.

हाडे आणि मांस पेशीमध्ये वेदना जाणवणे

आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत बनवते. व्हिटॅमिन डी शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्याचे कार्य करते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियमची मात्रा तयार होत नाही आणि यामुळे हाडे आणि मांस पेशीमध्ये वेदना सुरू होऊ लागतात. या सगळ्या समस्यांमुळे कंबर दुखी, मान दुखी, सांधेदुखी यासारख्या समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात.

ताण तणाव

बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला नेहमी उदास आणि अस्वस्थ भावना जाणवते. बहुतेक वेळा महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची लेवल कमी झाल्यावर महिला नेहमी ताणतणावाखाली वावरताना दिसतात. शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण जर आपल्याला वाढवायचे असेल तर अशा वेळी सकाळी कोवळ्या उन्हात 5 ते 10 मिनिटे प्रत्येकाने बसायला हवे. सूर्याच्या किरणांमुळे आपल्या शरीरात सेरोटोनिनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते यामुळे तुम्ही नेहमी आनंदी रहाल. तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता देखील नष्ट होऊन जाईल.

रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव

व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनण्यासाठी लाभदायी ठरते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले वायरस आणि बॅक्टेरिया पासून लढण्यासाठी आपल्याला शक्ती प्रदान करते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, सर्दी ,खोकला यासारख्या समस्यांना सामोरे जात असाल तर या मागील कारण व्हिटॅमिन डी देखील असू शकते.

टिप्स: वरील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सल्ले देत नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर अशा वेळी डॉक्टरांना आवश्य भेटा.

इतर बातम्या

Cholesterol: कोलेस्टेरॉलची समस्या आहे? दररोज या पेयांचा एक घोट घ्या आणि निरोगी राहा!

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.