रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड आणि प्लाझ्माची गरज आहे?; वाचा, या ठिकाणी मिळणार संपूर्ण माहिती

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढला आहे. (Want to check availability of Remdesivir, hospital beds in India? Visit Thise websites)

रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड आणि प्लाझ्माची गरज आहे?; वाचा, या ठिकाणी मिळणार संपूर्ण माहिती
coronavirus
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 4:17 PM

मुंबई: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे अनेक राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड आणि प्लाझ्माची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही त्रस्त झाले आहेत. तुम्हीही या गोष्टींमुळे त्रस्त झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशात कोणत्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा. (Want to check availability of Remdesivir, hospital beds in India? Visit Thise websites)

या ठिकाणी मिळणार माहिती

गेल्यावर्षी प्रमाणेच या वर्षीही कोरोनाचं संकट वाढलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर, बेड्स, ऑक्सिजन आणि प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना या सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळून देण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारांनीही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, दिवसाला दोन लाखाहून अधिक रुग्ण सापडत असल्याने रुग्णांना पुरेशी मदत मिळत नाहीये. त्यासाठीच कुठे कुठे काय सुविधा आहेत त्याची माहिती आम्ही देत आहोत. काही महत्त्वाचे संकेतस्थळ आणि हेल्पलाईन नंबर आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यामुळे तुम्हाला वेळेत मदत मिळण्यास उपयोग होणार आहे.

>> तुम्हाला सौम्य लक्षणे असतील आणि डॉक्टरांचा सल्ला हवा असेल तर मुंबईच्या नानावटी रुग्णालयाच्या https://www.nanavatihospital.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.

>> Dr Reddy या औषध कंपनीने लोकांच्या मदतीसाठी Readytofightcovid.in हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. या संकेतस्थळावर रेमडेसिवीर कुठे मिळेल याची सर्व माहिती देण्यात आली आहे. या कंपनीने एक हेल्पलाईनही सुरू केली आहे. रेमडेसिवीरची बाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 1800-266-708 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता.

>> सिप्ला या औषध निर्मात्या कंपनीनेही रुग्णालयांना थेट औषधे पुरवण्यास सुरुवात केली आहे. काळाबाजार रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती देण्यासाठी कंपनीच्या www.cipla.com ईमेल info.availability@cipla.com आणि हेल्पलाईन नंबर 8657311088 ला तुम्ही संपर्क साधू शकता.

>> दिल्लीतील बेड्सची स्थिती जाणून घ्यायची असेल तर दिल्ली सरकारच्या https://delhifightscorona.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

>> बेड आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या माहितीसाठी https://blog.indianhelpline.com/2021/04/15/india-fights-covid/ किंवा https://coronabeds.jantasamvad.org/beds.html या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

>> तुम्ही बेंगळुरूमध्ये असाल आणि तिथल्या आरोग्य सुविधांची माहिती हवी असेल तर https://covidhelplinebangalore.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

>> रांचीमध्ये असाल तर https://localsay.in/beds हे संकेतस्थळ तुमच्या उपयोगी पडेल.

प्लाझ्माची माहिती हवी असेल तर खालील संकेतस्थळांना भेट द्या

covidplasma.online/ https://dhoondh.com http://needplasma.in/  (Want to check availability of Remdesivir, hospital beds in India? Visit Thise websites)

संबंधित बातम्या:

राज्यात शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा; शरद पवारांचे सामाजिक संस्थांना आवाहन

बापरे ! मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना, प्लीज मदत करा, ट्विटरवरुन आवाहन

ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा

(Want to check availability of Remdesivir, hospital beds in India? Visit Thise websites)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.