Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा, आणि फायदे पाहा…

फळांचा वापर आहारात करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराला नैसर्गिक साखर मिळते, आणि गोड खाण्याची तुमची हौसही पूर्ण होते.

Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा, आणि फायदे पाहा...
fatImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:15 PM

Weight Loss Tips : सध्याच्या धावपळीच्या युगात तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे आणि आरोग्याकडे खूप गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. फास्ट फुडच्या जमान्यात आणि बदलत्या आहारामुळे तुमचे वजन वाढू शकते आणि त्याचा त्रास तुम्हालाच सोसावा लागत असतो. तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक प्रकारच्या फळांचा (Fruits) समावेश तुमच्या आहारात करू शकता. फळांचा वापर आहारात करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराला नैसर्गिक साखर (Natural Sugar) मिळते, आणि गोड खाण्याची तुमची हौसही पूर्ण होते.

तुमच्या आहारात तुम्ही जर फळांचा वापर करत असाल ती फायदेशीर असतात. ताजी फळे रसाळ आणि स्वादिष्टही असतात. तर काही फळे अशी आहेत ज्यामध्ये फायबर आणि पेक्टिनचे प्रमाण जास्त असते. हे दोन्हीही घटक फॅट बर्नर म्हणून म्हणजेच शरीरातील चरबी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करतात.

तुमच्या आहारात जर फळांचा वापर जास्त असेल तर ते चयापचय गतिमान होते, आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. फळांचा आहारात वापर असेल तर भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, मात्र फळांमधील कॅलरीज कमी असतात. तुमचे वजन कमी करण्यासाठी आहारतज्ञ कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करायला सांगतात. त्यामुळे टरबूज, ब्लू बेरी, पेरू आणि नाशपाती यांसारख्या इतर अनेक फळांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करु शकता.

टरबूज

टरबूजमध्ये किमान 90 टक्के पाणी असते, त्याचबरोबर त्यामध्ये अमिनो अॅसिड आर्जिनिनही असते, त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी हे घटक तुम्हाला मदत करतात.

पेरू

पेरू या फळामध्ये फायबर हा घटक सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी ठेवण्यास याचा फायदा होतो. पेरूमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, पेरूमुळे तुमच्या शरीरातील चयापचय प्रक्रिया ही गतीने होते, आणि त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.

पेअर म्हणजेच नाशपाती

पेअर या फळामध्ये व्हिटॅमिन सी हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पेअर हे फळ वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या फळामध्ये फायबर हा घटक भरपूर असतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील उत्साहही कायम ठेवण्यास हे फळ मदत करते. पेअर फळाला नाशपाती असेही म्हटले जाते, आणि ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.

संत्रे

सगळ्या फळांपेक्षा जास्त घटक कशामध्ये असती तर ते संत्र्यामध्ये असतात. त्याचबरोबर त्यामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अशी फळे सगळ्यात जास्त फायदेशीर असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे तुम्ही इतर गोष्टी खाण्याचे टाळता.

ब्लू बेरीज

ब्लू बेरी हे फळ ज्यांना ज्यांना माहिती असते ते नेहमीच आपल्या आहारात वापरत असतात. या फळामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असून ते चयापचयाची प्रक्रिया सगळ्यात जलद गतीने करतात. या फळाचे तुम्ही नियमित सेवन करत असाल तर तुमचे वजन, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास नक्कीच मदत होते.

सफरचंद

सफरचंद हे फळ सगळ्यांनाच आवडते, कारण ते खाण्यासाठीही आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. सफरचंदांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. वजन कमी करण्यासाठी याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. सफरचंद खाल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटत असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सफरचंदाचा रस देखील घेऊ शकता.

प्लम

प्लम या फळामध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात. त्यात पोटॅशियम, मँगनीज आणि व्हिटॅमिन ए, सी आणि क सारखे पोषक असतात. प्लममध्ये सुपरऑक्साईड असते, त्याला ऑक्सिजन रॅडिकल असेही म्हणतात. या फळाचा समावेश तुमच्या आहारात असेल तर शरीरातील चरबी कमी होण्यासाठी त्याची मदत होते.

संबंधित बातम्या

Belly fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास उपाय करा आणि स्लिम व्हा!

Skin care : तुमच्या त्वचेचे हरवलेले सौंदर्य परत मिळवण्यासाठी आजपासून ‘या’ 4 सुपरफूडचा आहारात समावेश करा!

Constipation Remedies : बद्धकोष्ठतेमुळे हैराण आहात? तर मग ‘या’ पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.