Zinc Deficiency कधी ऐकलंय का? काय आहेत लक्षणे? आहारात कशाचा समावेश करावा?
यापैकी एक म्हणजे झिंक, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, जखमा भरणे इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात.
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज असते, त्यापैकी एकाचीही कमतरता असेल तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. यापैकी एक म्हणजे झिंक, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, जखमा भरणे इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, झिंकच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात कोणते बदल होतात आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण कोणते अन्न खावे.
या गोष्टी खाल्ल्याने झिंक मिळेल
अंड्यातील पिवळं बल्क
ही अशी गोष्ट आहे जी आपण बरेचदा नाश्त्यात खातो, परंतु विशेषत: जे जिममध्ये जातात ते त्याचा पिवळा भाग म्हणजे पिवळ बल्क खाणे टाळतात, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पिवळं बल्क झिंकचा समृद्ध स्त्रोत आहे झिंक व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन बी 1 , थायमिन, व्हिटॅमिन बी 12, फोलेट, पॅन्थोनिक अॅसिड, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस देखील आढळतात.
लसूण
हा एक मसाला आहे जो भारतीय घरांमध्ये भरपूर वापरला जातो, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयोडीन, लोह आणि पोटॅशियम आढळतात. लसूण गरम आहे, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात ते मर्यादित प्रमाणात खावे.
कलिंगडाच्या बिया
साधारणपणे आपण कलिंगड खूप आवडीने खातो, पण अनेकदा या रसाळ फळाच्या बिया डस्टबिनमध्ये फेकून देतो, पण त्याचे फायदे माहित असतील तर तुम्ही तसे अजिबात करणार नाही. या फळाच्या बियांमध्ये झिंक आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील टिकून राहते. यासाठी कलिंगडाच्या बिया धुवून उन्हात वाळवून आपल्या आहारात त्यांचा समावेश करा.
झिंकची कमतरता असल्यास शरीर असे संकेत देते
- वजन कमी होणे
- जखमा उशीरा भरून येणे
- वारंवार अतिसार
- भूक न लागणे
- मानसिक आरोग्यावर परिणाम
- अधिक अशक्तपणा जाणवणे
- केस गळती
- चव न लागणेआणि वास न येणे
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)