लहान मुलांसाठी आईचे दूध का महत्त्वाचे? जाणून घ्या ब्रेस्ट फिडींगचे फायदे
गेल्या काही दशकांत डबा बंद दूध पिण्याचा ट्रेंड वाढला आहे. स्तनपान केल्याने लहान आणि दीर्घकालीन आजारांपासून बाळाचे संरक्षण होऊ शकते. अनेक महिलांना दूध पाजताना त्रास होतो, हे टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येतो, पण मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
मुंबई: आईचे दूध नवजात बाळासाठी उत्तम असते हे आपल्या सर्वांना माहित आहे, त्यामुळे जन्मानंतर आईचे जाड पिवळे दूध लगेच पाजले जाते, जेणेकरून बाळाचे आरोग्य चांगले राहू शकेल. पण गेल्या काही दशकांत डबा बंद दूध पिण्याचा ट्रेंड वाढला आहे. स्तनपान केल्याने लहान आणि दीर्घकालीन आजारांपासून बाळाचे संरक्षण होऊ शकते. अनेक महिलांना दूध पाजताना त्रास होतो, हे टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येतो, पण मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. चला तर मग जाणून घेऊया स्तनपानाचे फायदे काय आहेत.
स्तनपानाचे फायदे
- लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो, त्यामुळे ताप आणि इतर आजार अटळ असतात. जन्मापासून आईचे दूध पिणाऱ्या नवजात बालकांची प्रतिकारशक्ती इतर मुलांपेक्षा चांगली असते. स्तनपानाने जी प्रतिकारशक्ती प्राप्त होते, ती डबाबंद दुधात मिळत नाही.
- आईच्या दुधात अँटिऑक्सिडंट, एंझाइम्स आणि अँटीबॉडीज आढळतात, ज्यामुळे मुलांना आजारांपासून संरक्षण तर मिळतेच, शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास त्यापासून सुटका मिळवणेही सोपे जाते.
- लहान मुले अनेकदा पोटाच्या विकारांना बळी पडतात. त्यांना अतिसार, बद्धकोष्ठता, उलट्या आणि गॅसशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. बाळाला असा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर त्यांना आईचे दूध पाजावे.
- अनेक मुले त्यांच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत जिवंत राहत नाहीत, हे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे की, ज्या बालकांना आईचे दूध पाजले जात नाही, अशा बालकांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण जास्त आढळते, कारण ते आजारांपासून कमी सुरक्षित असतात.
- मुलांमध्ये लठ्ठपणा देखील धोकादायक असतो, परंतु आईचे दूध नियमित प्यायल्याने बाळाचे वजन टिकून राहते, तसेच ते मुलांच्या ओरल हेल्थसाठी देखील फायदेशीर मानले जाते यामुळे कॅव्हिटी आणि इतर दंत समस्यांचा धोका कमी होतो.