योगासनामुळे ‘फुफ्फुस-ह्रदयरोगासह मधुमेहा’ सारख्या जुनाट आजारांचा धोका होतो कमी; ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमीत्त संशोधकांचा दावा!

योग आणि आरोग्य: गेल्या काही वर्षांत, आधुनिक जिवनशैलीमुळे आलेल्या शारीरिक निष्क्रियतेमुळे विविध प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्यां उभ्या राहिल्या आहेत. परंतु, योग क्रियेतून अनेक आजारांवर मात करता येते याचा अनुभव अनेकांना आला आहे.

योगासनामुळे ‘फुफ्फुस-ह्रदयरोगासह मधुमेहा’ सारख्या जुनाट आजारांचा धोका होतो कमी; ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमीत्त संशोधकांचा दावा!
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमीत्त संशोधकांचा दावा!Image Credit source: Businessworld
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:27 PM

शारीरिक निष्क्रियतेमुळे शरीरातील रक्ताभिसरण संस्था (Circulatory Institution) प्रभावित होते आणि लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. या सर्व परिस्थितीमुळे फुफ्फुस-हृदयापासून ते मधुमेहापर्यंत गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा सर्व वाढत्या आजारांना प्रतिबंध (Disease prevention) करण्यासाठी आरोग्य तज्ञांमार्फत लोकांना त्यांच्या नित्यक्रमात योगासनांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. योग आसनांच्या सरावाने शारीरिक क्रिया कायम राहते. फुफ्फुस आणि हृदय हे अवयव निरोगी ठेवता येतात. योगाचे अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायदे आहेत. योगाच्या फायद्यांविषयी लोकांना जागृत करण्यासाठी आणि योगासनांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा केला जातो. जाणून घ्या, कोणत्या योगासनांचा नित्यक्रमात समावेश करून अनेक गंभीर व जुनाट आजारांचा धोका कसा कमी केला जाऊ शकतो.

योगासने वाढवते फुफ्फुसाची क्षमता

योगाचे फायदे जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात तज्ञांना असे आढळून आले की, योगासने करण्याची सवय तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. थायलंडमधील खोनकेन विद्यापीठातील प्रमुख संशोधक रॉयरिन चनाविरुत म्हणतात की, संशोधनात असे दिसून आले आहे की, काही दिवस योगासन केल्या नंतर रुग्णांच्या छातीची लवचिकता (स्ट्रेचिंग क्षमता) आणि काम करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

अनेक रोगांचा धोका कमी करू शकतो

प्रोफेसर रॉयरिन सांगतात, काही प्रकारचे योगासने केवळ फुफ्फुसाचीच शक्ती वाढवतात असे नाही, तर त्यांच्या नियमित सरावामुळे श्वासोच्छवासाची क्षमता सुधारू शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांमुळे दम्यासह श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो. इतर प्रकारच्या रोगांची गुंतागुंत कमी करता येते. मार्जरी आसन, वृक्षासन आणि कॅमल पोज इत्यादी अनेक योगासनांचा सराव यामध्ये खूप फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

हृदयविकारावर फायदेशीर

योगाभ्यास केल्याने रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते, तसेच हृदय गती कमी होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारणे शक्य होते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्यांनी तीन महिने योगाभ्यास केला त्यांना हृदयविकाराचा धोका इतरांच्या तुलनेत कमी झाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.