जिंदाबाद… जिंदाबाद… जिंदाबादचे नारे सुरू असतानाच जोरदार बॉम्बस्फोट; नेत्यासह 44 लोकांचा मृत्यू; पाकिस्तान हादरला

घोषणांचा हा धुंवाधार पाऊस सुरू असतानाच अचानक प्रचंड मोठा आवाज आला. बॉम्ब स्फोट झाल्याबरोबर आग आणि धुळीचे लोट असमंतात उडाले. सर्वत्र धूरच धूर झाला होता. धूर आणि धुळीमुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं.

जिंदाबाद... जिंदाबाद... जिंदाबादचे नारे सुरू असतानाच जोरदार बॉम्बस्फोट; नेत्यासह 44 लोकांचा मृत्यू; पाकिस्तान हादरला
Pakistan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 8:50 AM

खैबर पख्तूनख्वा | 31 जुलै 2023 : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे रविवारी जोरदार बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. हा बॉम्ब स्फोट खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यात झाला आहे. जमीयत उलेमा इस्लाम फजलच्या (JUIF) रॅलीवेळी हा बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात JUIFचा प्रमुख मौलाना जियाउल्लाह जान यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोट अत्यंत शक्तीशाली होता. स्फोट होताच लोक प्रचंड घाबरले आणि मिळेल तिकडे सैरावैरा धावत होते. त्यामुळे अनेकांना मारही लागल्याचं सांगितलं जातं. मात्र, या स्फोटाने पाकिस्तान पुरता हादरून गेला आहे.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, जमीयत उलेमा इस्लाम फजलचा नेता मौलाना जियाउल्लाह जान यांचा बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला आहे. या स्फोटातील जखमींना तात्काळ पेशावर आणि टिमरगेरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला त्या ठिकाणी तात्काळ मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांमधून मृतदेह आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेले जात होते.

हे सुद्धा वाचा

चौकशीची मागणी

दरम्यान जेयूआयएफचे नेते मौलाना फजलूर रहमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि स्थानिक सरकारकडे या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच या स्फोटानंतर जेयूआयएफच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रक्तदान करण्याचं आवाहनही केलं. हा मानवतेवरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

असा झाला स्फोट

या हल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अत्यंत धक्कादायक आहे. जमीयतच्या रॅलीत लोक मोठ्या प्रमाणावर जमले होते. मंचावर पक्षांच्या नेत्यांची भाषणे सुरू होती. यावेळी जमावाकडून जिंदाबाद, जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी मंचावरून एक आरोळी आली. हजरत मौलाना अब्दुल रशीद साहब… जिंदाबाद, जिंदाबाद… या आरोळी सरशी कारयकर्त्यांनीही जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

घोषणांचा हा धुंवाधार पाऊस सुरू असतानाच अचानक प्रचंड मोठा आवाज आला. बॉम्ब स्फोट झाल्याबरोबर आग आणि धुळीचे लोट असमंतात उडाले. सर्वत्र धूरच धूर झाला होता. धूर आणि धुळीमुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं. प्रचंड मोठा आवाज आल्याबरोबर लोकांनी दिसेल तिकडे पळण्यास सुरुवात केली. एकमेकांच्या अंगावर लोक पडत होते. चेंगराचेंगरी झाली. संपूर्ण परिसरात आफरातफरी माजली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.