AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात आता पहिली हिंदू महिला अधिकारी, सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात सर्वात कठीण CSS परीक्षा पास

पाकिस्तानात सर्वात अवघड असलेल्या अधिकाऱ्यांच्या परीक्षेत या मुलीने बाजी मारली आहे. सना रामचंद्र गुलवानी असं या मुलीचं नाव आहे.

पाकिस्तानात आता पहिली हिंदू महिला अधिकारी, सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात सर्वात कठीण CSS परीक्षा पास
सना ही डॉक्टर आहे. याआधी तिने बेनझिर भुत्तो वैद्यकिय विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसीनची पदवी घेतली आहे.
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 6:31 PM
Share

इस्लामाबाद: पाकिस्तानात पहिल्यांदाच एका हिंदू समाजातील एक मुलगी अधिकारी झाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. पाकिस्तानात सर्वात अवघड असलेल्या अधिकाऱ्यांच्या परीक्षेत या मुलीने बाजी मारली आहे. सना रामचंद्र गुलवानी असं या मुलीचं नाव आहे. सना ही 37 वर्षांची असून तिने पहिल्याच प्रयत्नात ही बाजी मारली आहे. ( A Hindu girl named Sana Gulwani has passed the most difficult administrative service exam in Pakistan )

कोण आहे सना गुलवानी?

सना ही शिकारापूर या पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिने सिंध प्रांतातूनच या परीक्षेसाठी अर्ज केला होता. आधीपासूनच सरकारी अधिकारी होण्याच्या इच्छेने प्रेरित असलेल्या सनाने, या परीक्षेची जोरदार तयारी केली. विशेष म्हणजे सना ही डॉक्टर आहे. याआधी तिने बेनझिर भुत्तो वैद्यकिय विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसीनची पदवी घेतली आहे. त्यानंतर ती सर्जन झाली. युरॉलॉजी विषयात तिने मास्टर डिग्री मिळवली आहे.

पाकिस्तानात सर्वात कठीण परीक्षा

आपल्याकडे ज्याप्रकारे UPSC परीक्षा पास होणं अवघड आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानात सेंट्रल सुपिरिअर सर्व्हिसेस म्हणजेच CSS ही परीक्षा अवघड मानली जाते. पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत येण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होण गरजेचं आहे. या परीक्षेसाठी सना गेल्या काही वर्षांपासून कठीण परिश्रम घेत होती. सना ही शिख धर्मालाही खूप मानते, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने ‘वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी दी फतेह’ म्हटलं. पाकिस्तानातील ही परीक्षा इतकी कठीण आहे की, परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या फक्त 2 टक्के विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होतात. अनेकदा परीक्षा देऊनही, अनेकांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न अर्धवटच राहतं, मात्र सनाने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत बाजी मारली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.