अमेरिकेची अफगाणिस्तानमधील सैन्य मोहिम संपली, 19 वर्ष 10 महिने 25 दिवसांनी ‘घरवापसी’
अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचा अखेर 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवसांनी शेवट झालाय. तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत मदत मोहिमेला मूदत देऊन देश सोडण्यास सांगितलं होतं. मात्र, अमेरिकेने 30 ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं. यानंतर तालिबानने लगेचच अफगाणसाठी स्वातंत्र्य दिवस असल्याचं घोषित केलं.
काबुल : अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचा अखेर 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवसांनी शेवट झालाय. तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत मदत मोहिमेला मूदत देऊन देश सोडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे 31 ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहिम चालेल असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेने 30 ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं. यानंतर तालिबानने लगेचच अफगाणसाठी स्वातंत्र्य दिवस असल्याचं घोषित केलं.
Three C-17s have just left Hamid Karzai International Airport in a row. The time now is midnight in Kabul. This could be the end of the US presence in Afghanistan. pic.twitter.com/rS1NJKsxWy
— Oren Liebermann (@OrenCNN) August 30, 2021
अमेरिकेच्या शेवटच्या 3 सी-17 विमानांनी 30 ऑगस्टला रात्री उरलेल्या अमेरिकन सैनिकांसह हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डान केलं. यासह अमेरिकेचं अफगाणमधील अस्तित्व संपलंय. हा अफगाणमधील युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची आणि अनागोंदीची सुरुवात हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी अफगाणमध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे अफगाणचं भविष्य सध्या तरी तालिबानी नियंत्रणात अंधारातच दिसत आहे.
“अमेरिकेने अफगाण सोडला, युद्धाचा शेवट”
The US war in Afghanistan lasted 19 years, 10 months and 25 days.
The war is over. America’s last troops have just left Kabul airport.
The Taliban won
— Murad Gazdiev (@MuradGazdiev) August 30, 2021
पत्रकार मुराद यांनी अमेरिकेचे उरलेले सैनिकही अफगाण सोडून अमेरिकेला परतल्याचं सांगत हा येथील युद्धाचा शेवट असू शकतो, असं मत व्यक्त केलंय. मुराद म्हणाले, “अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्याचं युद्ध 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवस चाललं. अखेरच्या अमेरिकन सैनिकांनीही काळी वेळापूर्वी अफगाणिस्तान सोडले. आता युद्ध संपलंय.”
अमेरिकेने अफगाण सोडल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला विजय साजरा केलाय.
आयसिसचा हल्ला
दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एका मोठ्या स्फोटानं हादरली होती. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS नं आठवड्याभरात सलग दुसरा हल्ला केला. एक रॉकेट काबूल एअरपोर्ट (kabul airport)च्या दिशेनं सोडण्यात आलं. अर्थात टार्गेटवर अमेरीकन सैनिक आणि जिथून अमेरीकन विमानं उड्डान भरतायत तो भाग होता. पण हे हल्ला करण्यात आलेलं रॉकेट लक्ष्य भेदू शकलं नाही. आणि ते रॉकेट जवळच्याच निवासी भागात कोसळलं.
बदल्याचं चक्र
इसिसिनं आधी काबूल एअरपोर्टवर हल्ला केला, ज्यात 169 अफगाण नागरीक आणि 13 अमेरीकन सैनिकांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून अमेरीकेनं इसिसिच्या ठिकाण्यांवर ड्रोन हल्ला केला (US drone strike). परत याचा बदला म्हणून इसिसिनं हल्ला केल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन जणांना जीव गमवावा लागलाय. काही जण जखमी आहेत. मृत आणि जखमींमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे. एअरपोर्टकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 1 कि.मी. अंतरावर हा हल्ला केला गेलाय.
हेही वाचा :
काबुलमध्ये ‘इस्राईल-पॅलेस्टाईन’ प्रमाणे युद्ध, रॉकेट हल्ले करत अमेरिकेला कोण आव्हान देतंय?
अमेरिकेची कमाल, काबूल एअरपोर्टरवर डागलेली 5 रॉकेट्स जिथल्या तिथे निकामी!
Bacha Bazi : लोकनियुक्त किंवा तालिबानी, सरकार कुणाचंही असो अफगाणमध्ये बच्चाबाजी जोरात, काय आहे प्रकार?
व्हिडीओ पाहा :
America leave Afghanistan after 20 years Taliban declared complete independence