AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US troops exit : सर्वात शेवटी अफगाणिस्तानची भूमी सोडली, कोण आहे अमेरिकेचा ‘आर्मी जनरल’?

अमेरिकेची (America) अफगाणिस्तानमधील सर्वाधिक काळ चाललेली युद्ध मोहिम अखेर सोमवारी (30 ऑगस्ट) संपली. तब्बल 20 वर्षांच्या सैन्य कारवाईनंतर अमेरिकेच्या शेवटच्या सैन्य तुकडीने (US Troops) अफगाणिस्तान (Afghanistan) सोडलं. यातही अमेरिकेचे आर्मी जनरल सर्वात शेवटी अफगाणिस्तानची भूमि सोडणारे व्यक्ती ठरलेत.

US troops exit : सर्वात शेवटी अफगाणिस्तानची भूमी सोडली, कोण आहे अमेरिकेचा 'आर्मी जनरल'?
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 12:56 PM
Share

काबुल : अमेरिकेची (America) अफगाणिस्तानमधील सर्वाधिक काळ चाललेली युद्ध मोहिम अखेर सोमवारी (30 ऑगस्ट) संपली. तब्बल 20 वर्षांच्या सैन्य कारवाईनंतर अमेरिकेच्या शेवटच्या सैन्य तुकडीने (US Troops) अफगाणिस्तान (Afghanistan) सोडलं. यातही अमेरिकेचे आर्मी जनरल सर्वात शेवटी अफगाणिस्तानची भूमि सोडणारे व्यक्ती ठरलेत. क्रिस डोनह्यू (Chris Donahue) असं या सैन्य अधिकाऱ्याचं नाव आहे. ते 82 वे एअरबोर्न डिव्हीजनचे (82nd Airborne Division) कमांडर आहेत. ते सी-17 ग्लोबमास्टर III विमानाने (C-17 Globemaster III) काबुल एअरपोर्टवरुन (Kabul Airport) अमेरिकेला रवाना झाले. तालिबानने अमेरिकेला आपले सर्व सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी 31 ऑगस्टची मूदत दिली होती.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सर्वात शेवटी अफगाण सोडणाऱ्या अमेरिकी सैनिकाचा फोटो शेअर करत ट्विट केलंय. यात त्यांनी म्हटलं, “अफगाणिस्तान सोडणारे शेवटचा अमेरिकन सैनिक : मेजर जनरल क्रिस डोनह्यू. ते 30 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकेच्या वायु दलाच्या C-17 वर 82 वे एअरबोर्न डिवीजन बोर्डचे कमांडिंग जनरल होते. अशाप्रकारे काबुलमधील अमेरिकेची मोहिम संपली आहे.” सी-17 ग्लोबमास्टरमध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राजदूत राहिलेले रॉस विल्सन देखील होते. हे सर्व लोक घरी जाण्यासाठी रवाना झालेत.

मेजर डोनह्यु कोण आहेत?

52 वर्षीय मेजर जनरल क्रिस डोनह्यू हे अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन सैनिक ठरलेत. क्रिस डोनह्यू यांनी न्यूयॉर्कच्या वेस्ट पॉईंट येथील युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली. यानंतर दक्षिण कोरियामधील 2 ऱ्या इन्फंट्री डिव्हिजन आर्मीमध्ये रायफल प्लाटून लीडर म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यांनी अफगाणिस्तानच्या आधी दक्षिण कोरिया आणि पनामामध्ये देखील विविध सैन्य मोहिमांसाठी काम केलंय. याशिवाय त्यांनी त्यांच्या एकूण 30 वर्षांच्या कारकिर्दीत 17 सैन्य मोहिमांमध्ये काम केलंय. यात अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लिबिया आणि पूर्व युरोपमधील सैन्य मोहिमांचा समावेश आहे. त्यांनी विशेष दलांसोबतही काम केलंय.

अमेरिकेची अफगाणिस्तानमधील सैन्य मोहिम संपली, 19 वर्ष 10 महिने 25 दिवसांनी ‘घरवापसी’

अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचा अखेर 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवसांनी शेवट झालाय. तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत मदत मोहिमेला मूदत देऊन देश सोडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे 31 ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहिम चालेल असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेने 30 ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं. यानंतर तालिबानने लगेचच अफगाणसाठी स्वातंत्र्य दिवस असल्याचं घोषित केलं.

अमेरिकेच्या शेवटच्या 3 सी-17 विमानांनी 30 ऑगस्टला रात्री उरलेल्या अमेरिकन सैनिकांसह हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डान केलं. यासह अमेरिकेचं अफगाणमधील अस्तित्व संपलंय. हा अफगाणमधील युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची आणि अनागोंदीची सुरुवात हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी अफगाणमध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे अफगाणचं भविष्य सध्या तरी तालिबानी नियंत्रणात अंधारातच दिसत आहे.

हेही वाचा :

अमेरिकेची अफगाणिस्तानमधील सैन्य मोहिम संपली, 19 वर्ष 10 महिने 25 दिवसांनी ‘घरवापसी’

काबुलमध्ये ‘इस्राईल-पॅलेस्टाईन’ प्रमाणे युद्ध, रॉकेट हल्ले करत अमेरिकेला कोण आव्हान देतंय?

Bacha Bazi : लोकनियुक्त किंवा तालिबानी, सरकार कुणाचंही असो अफगाणमध्ये बच्चाबाजी जोरात, काय आहे प्रकार?

व्हिडीओ पाहा :

Know who is last American soldier who leave Kabul Airport Afghanistan

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.