Afghanistan : पुढचं लक्ष्य काश्मीर, अल कायदाची दर्पोक्ती, तालिबानच्या विजयाचा जल्लोष

अफगाणिस्तानवर कट्टरतावादी तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर आता जागतिक दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al Qaeda) जल्लोष केलाय. तसेच मुस्लीम समुदायाला इतर मुस्लीम क्षेत्रही मुक्त करण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे तालिबानच्या विजयाचा जल्लोष करताना अल कायदाने त्यांचं पुढील लक्ष्य काश्मीर असेल अशी दर्पोक्तीही केलीय.

Afghanistan : पुढचं लक्ष्य काश्मीर, अल कायदाची दर्पोक्ती, तालिबानच्या विजयाचा जल्लोष
Afghanistan File photo
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 10:02 AM

काबुल : अफगाणिस्तानवर कट्टरतावादी तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर आता जागतिक दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al Qaeda) जल्लोष केलाय. तसेच मुस्लीम समुदायाला इतर मुस्लीम क्षेत्रही मुक्त करण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे तालिबानच्या विजयाचा जल्लोष करताना अल कायदाने त्यांचं पुढील लक्ष्य काश्मीर असेल अशी दर्पोक्तीही केलीय. अफगाणवरील विजयाने मुस्लिमांच्या संघर्षाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं सांगत पुढील टप्प्यातील संघर्ष सुरू करण्याचं आवाहन अल कायदानं केलंय. यासाठी मुस्लीमबहुल भागांची एक यादीच तयार करण्यात आलीय.

अल कायदाने आपल्या यादीत जम्मू काश्मीरचा समावेश करुन भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, दुसरीकडे चीनच्या ताब्यातील शिनजियांग आणि रशियाच्या ताब्यातील चेचन्यातही मुस्लीमांवर अत्याचाराचे आरोप होत आलेत. मात्र, या दोन्ही भागांचं नाव अल कायदाच्या यादीत नाही. यामुळेही चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत.

या यादीत काश्मीरशिवाय लेवेंट किंवा भूमध्यसागरीय स्वाथचा समावेश केलाय. भूमध्यसागरीय स्वाथमध्ये इराक, सीरिया, जॉर्डन आणि लेबनान अशा देशांचा समावेश होतो. उत्तर पश्चिम आफ्रीकेतील लीबिया, मोरक्को, अल्जीरिया, मॉरिटानिया, ट्यूनीशिया, येमेन आणि सोमालियाचाही या यादीत समावेश आहे. अलकायदाची अधिकृत माध्यम संस्था ‘अस-साहब’ने म्हटलंय, “अल्लाहच्या मदतीने तालिबानच्या या ऐतिहासिक विजयानं मुस्लीम जनतेसाठी त्या अत्याचारी निरंकुश शासनापासून मुक्तीचा मार्ग मोकळा केलाय. या ठिकाणी पाश्चिमात्य देशांनी सरकारं थोपवली आहेत.”

अल-कायदाचे वरिष्ठ नेते अफगाणिस्तानमध्ये परतले

जगभरात दहशतवादी कृत्य केल्या प्रकरणी अल-कायदावर अनेक देशांनी बंदी घातलीय. मात्र, याच दहशतवादी संघटनेचे नेते अफगाणिस्तानमध्ये खुलेआमपणे फिरत आहेत. तालिबानकडून या संघटना आणि नेत्यांना आश्रय दिला जातोय. अल-कायदाचा वरिष्ठ नेता आणि ओसामा बिन लादेनचा सहकारी डॉ. अमीन-उल-हक (Dr. Amin-ul-Haq) अफगाणमधील नांगरहार प्रांतात आपल्या मूळ गावी परतलाय. उल हक अफगाणिस्तानमधील अल-कायदाचा एक मुख्य कमांडर होता. तोरा बोरा गुहांमध्ये त्याच्याकडे लादनेच्या सुरक्षेचा प्रभार होता. आता तालिबानने अफगाणवर ताबा मिळवल्यावर अल कायदाचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये परतत आहेत.

हेही वाचा :

तालिबानराजमध्ये अफगाणिस्तानात ‘या’ 4 शब्दांचं महत्त्व वाढलं, काय आहे अर्थ? समजून घ्या

तालिबानकडून अफगाणिस्तानवर सत्ता आणि महिला रिपोर्टरचा ड्रेस बदलला, काय आहे खरं? वाचा…

अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या ‘तालिबान’चे 7 प्रमुख नेते, वाचा कोण आहेत ते?

व्हिडीओ पाहा :

Terrorist organization al qaida celebrate Afghanistan victory over America make Kashmir next target

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.