VIDEO: तालिबान्यांपासून सुटकेसाठी उभे, अचानक स्फोट आणि मृतदेहांचा खच, ओढ्यातील रक्ताच्या पाण्यानं हादरवलं

काबुल विमानतळावरच हल्ला चढवला. यात 13 अमेरिकन सैनिकांसह जवळपास 169 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात विमानतळ परिसरात अचानक स्फोट झाल्यावर कसा मृतदेहांचा खच तयार झाला आणि ओढ्यातील रक्ताचं पाणी पाहणाऱ्यांमध्ये कशी धडकी भरवतंय हे दिसतंय.

VIDEO: तालिबान्यांपासून सुटकेसाठी उभे, अचानक स्फोट आणि मृतदेहांचा खच, ओढ्यातील रक्ताच्या पाण्यानं हादरवलं
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 7:46 AM

काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणवर ताबा मिळवला. यासह तेथे अनेक कट्टरतावादी दहशतवादी गटांनी आपले पाय पसरायला सुरुवात केलीय. या दहशतवाद्यांची हिंमत इतकी वाढलीय की त्यांनी आता अमेरिकन सैन्याच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावरच हल्ला चढवला. यात 13 अमेरिकन सैनिकांसह जवळपास 169 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात विमानतळ परिसरात अचानक स्फोट झाल्यावर कसा मृतदेहांचा खच तयार झाला आणि ओढ्यातील रक्ताचं पाणी पाहणाऱ्यांमध्ये कशी धडकी भरवतंय हे दिसतंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एका छोट्या ओढ्यात नागरिकांच्या मृतदेहांचा खच पडलेला दिसतोय. यातील काही जखमी वेदनेने व्हिवळत आहेत. इतर लोक या स्फोटात जखमी झालेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. रक्तपातानं तेथील ओढ्याचं पाणी लालभडक झालेलं दिसत आहे (Pool of bood after Kabul blast). मात्र, या व्हिडीओची सत्यता अजून पडताळण्यात आलेली नाही.

सोशल मीडियात हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याचा दावा काय?

ट्विटरवर एका व्हेरिफाईड अकाऊंट असलेल्या एका पत्रकाराने दावा केलाय की हा व्हिडीओ अफगाणिस्तानमधील आहे. या पत्रकाराने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “रक्ताचा ओढा. गटार झालेल्या या ओढ्यातील मृतदेहांचा खच. अफगाणिस्तानमधील रक्तापात सुरूच आहे. अनेक कुटुंबं यात उद्ध्वस्त झालीत. अफगाणिस्तानचे लोक कधीही न संपणाऱ्या संकटाला तोंड देत आहेत.”

व्हिडीओबाबत माध्यमांमध्ये काय दावे?

माध्यमांमध्ये या व्हिडीओबाबत दावा करण्यात आलाय की अफगाण लोक प्रचंड उकाडा असल्यानं उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी शेजारीच असलेल्या ओढ्यात उभे होते. अचानक हल्ला झाला आणि तेथे उभे असलेल्या लोकांच्या चिंधड्या उडाल्या. हे सर्व नागरिक अफगाणमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे विमानाने देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात आयसिसच्या दोन सदस्यांचा खात्मा, तर एक जण जखमी

बायडन म्हणाले, “अमेरिकेने हल्ल्याला चोख उत्तर देत अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट आयसिस-के विरोधात एअर स्ट्राईक केलं. हा हल्ला शेवटचा नाहीये. हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना याची किंमत चुकवावी लागेल. जेव्हा केव्हा कुणी अमेरिकेला नुकसान पोहचवतं किंवा आमच्या सैन्यावर हल्ला करतं तेव्हा आम्ही उत्तर देऊ यात काहीच शंका नाही.” अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्यात आयसिसचे दोन दहशतवादी मारले गेलेत आणि एक जण जखमी झाल्याचंही सांगितलं जातंय.

‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान

जो बायडन म्हणाले होते, “आम्ही अफगाणिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना वाचवू. आमचं मिशन सुरू असून अफगाणच्या सहकाऱ्यांना आम्ही बाहेर काढू. काबुल विमानतळाबाहेरील हल्ल्यात मारले गेलेले अमेरिकन सैनिक हिरो होते. ते इतरांना वाचवण्यासाठी एक धोकादायक आणि निस्वार्थी मोहिमत सहभागी होते. अजूनही कमीत कमी 1,000 अमेरिकन नागरिक आणि इतर अनेक लोक काबुलमधून निघण्यासाठी संघर्ष करत आहेत.”

‘आता जागाही आमचीच आणि वेळही, तिथंच प्रत्युत्तर देणार’

“अमेरिकेला हे माहिती आहे की या हल्ल्याचा आदेश देणारा आयसिसचा नेता कोण होता? तो कोठेही असेल, तरी त्याला कोणतंही मोठं मिलिट्री ऑपरेशन न करता आम्ही पकडू. मिलिट्री कमांडर्सला ISIS-K वर स्ट्राईक करण्याचा प्लॅ करण्यास सांगण्यात आलंय. आता जागाही आम्ही निवडलेली असेल आणि वेळही, तिथेच हल्लेखोरांना उत्तर देऊ,” असं मत बायडन यांनी व्यक्त केलं होतं.

हेही वाचा :

अमेरिकानं काबुल हल्ल्याचा बदला घेतला, ठरलेल्या वेळ-ठिकाणावर ISIS-K च्या दहशतवाद्यावर एअर स्ट्राईक

काबुल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने बचाव मोहीम थांबवली

Kabul Airport Attack: ‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान

व्हिडीओ पाहा :

Video of Blood pool on social media after ISIS-K attack on Kabul airport Afghanistan

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.