America Texas Hostage : अमेरिकेत धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह, बंदूकधाऱ्याचा प्रवेश 4 जण ओलीस,नेमकं काय घडलं?
घटनास्थळी पोलीस असून त्यांचा अपहरणकर्त्याशी संवाद सुरु असून एका व्यक्तीची सुटका करण्यात यश आलं असून कोणत्याही प्रकारे त्याला जखमी करण्यात आलं नसल्याची माहिती आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सासमध्ये (America Texas Hostage) धार्मिक कार्यक्रमात घुसून चार जणांचं अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदूकधारी अपहरणकर्त्यानं अमेरिकेतील सिनेगॉग (synagogue) या धार्मिक ठिकाणी सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदूक घेऊन प्रवेश केला आणि चार जणांना ओलीस ठेवसं आहे. अपहरणकर्त्यानं पाकिस्तानी वैज्ञानिक आफिया सिद्दीकीच्या (Aafia Siddiki) सुटकेची मागणी केली आहे. अमेरिकन सुरक्षा दलांना ओलीस ठेवलेल्या चार पैकी एका जणाची सुटका करण्यात यश आल्याची माहिती आहे. या घटनेची राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दखल घेतली असून ते परिस्थिती नजर ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे.सिनेगॉगमध्ये सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमात बंदूकधारी व्यक्तींनी प्रवेश केला. या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सुरु होतं. या दरम्यान हा प्रकार घडल्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
एएनआयचं ट्विट
US | President Joe Biden has been briefed about the developing hostage situation in the Dallas area. He will continue to receive updates from his senior team as the situation develops: White House Press Secretary Jen Psaki pic.twitter.com/U7Ez0c6dYM
— ANI (@ANI) January 15, 2022
पाकिस्तानी वैज्ञानिकाच्या सुटकेची मागणी
अपहरणकर्त्यानं अमेरिकन पोलिसांच्या कैदेत असणाऱ्या आफिया सिद्दीकी याच्या सुटकेची मागणी केली आहे. आफिया सिद्दीकी वर अफगाणच्या कैदेत असताना अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आफिया सध्या फेडरल जेलमध्ये कैदेत आहे.
आफियाचा भाऊ असल्याचा अपहरणकर्त्याचा दावा
अपहरणकर्त्यानं स्वत: आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचा दावा केला होता. मात्र, आफिया सिद्दीकीच्या भावानं स्वत: समोर येत चार जणांना ओलीस ठेवणारी व्यक्ती आणि आफिया सिद्दीकीचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. चार जणांना ओलीस ठेवणारी व्यक्ती आफिया सिद्दिकीचा भाऊ नसल्याचं यामुळं स्पष्ट झालं आहे.
घटनेचं फेसबुक लाईव्ह
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेथ इस्त्राईल काँग्रेशन मध्ये घटना घडलीय. सिनेगॉग मध्ये सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतं. त्या लाईव्हमध्ये दिसून येतंय की, एक व्यक्ती बंदूक घेऊन तिथं घुसला आणि त्यानं चार जणांना ओलीस ठेवलं. यामध्ये एका यहूदी धार्मिक गुरुचा देखील समावेश आहे. घटनास्थळी पोलीस असून त्यांचा अपहरणकर्त्याशी संवाद सुरु असून एका व्यक्तीची सुटका करण्यात यश आलं असून कोणत्याही प्रकारे त्याला जखमी करण्यात आलं नसल्याची माहिती आहे. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर खाली केला असून रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. या भागात कुणीही जाऊ नये, असं सांगण्यात आलेलं आहे. तर, जो बायडन हे देखील परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. इस्त्राईलकडून देखील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.
इतर बातम्या
America 4 People hostage at texas synagouge for release of Pakistani Scientist Aafia Siddiki