अमेरिकानं काबुल हल्ल्याचा बदला घेतला, ठरलेल्या वेळ-ठिकाणावर ISIS-K च्या दहशतवाद्यावर एअर स्ट्राईक
अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आयसिस-के संघटनेच्या मोरक्यावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलंय. अमेरिकेने मानवरहित ड्रोनच्या मदतीने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये काबुल हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा 48 तासात खात्मा केल्याचा दावा केलाय.
काबुल : अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आयसिस-के संघटनेच्या मोरक्यावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलंय. अमेरिकेने मानवरहित ड्रोनच्या मदतीने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये काबुल हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा 48 तासात खात्मा केल्याचा दावा केलाय. या कारवाईत नांगरहारमधील आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.
अमेरिकेच्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर आयसिसकडून प्रत्युत्तराची शक्यता आहे. हे लक्षात घेत अमेरिकेने काबुल विमानतळाच्या गेटवरील नागरिकांना जागा सोडण्यास सांगितलंय.
BREAKING: U.S. airstrike targets Islamic State in Afghanistan in retaliation for deadly Kabul airport attack, according to Pentagon. https://t.co/a2PmPNds94
— The Associated Press (@AP) August 28, 2021
अमेरिकेचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितलं, “अमेरिकेच्या सैन्याने काबुल हल्ल्यामागील इस्लामिक स्टेट-खुरासानच्या (आयएसके) मुख्य सूत्रधाराविरोधात कारवाई केली. यात अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतात मानवरहित हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित दहशतवाद्याचा खात्मा झालाय. यात सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती नाही.”
‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान
जो बायडन म्हणाले होते, “आम्ही अफगाणिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना वाचवू. आमचं मिशन सुरू असून अफगाणच्या सहकाऱ्यांना आम्ही बाहेर काढू. काबुल विमानतळाबाहेरील हल्ल्यात मारले गेलेले अमेरिकन सैनिक हिरो होते. ते इतरांना वाचवण्यासाठी एक धोकादायक आणि निस्वार्थी मोहिमत सहभागी होते. अजूनही कमीत कमी 1,000 अमेरिकन नागरिक आणि इतर अनेक लोक काबुलमधून निघण्यासाठी संघर्ष करत आहेत.”
‘आता जागाही आमचीच आणि वेळही, तिथंच प्रत्युत्तर देणार’
“अमेरिकेला हे माहिती आहे की या हल्ल्याचा आदेश देणारा आयसिसचा नेता कोण होता? तो कोठेही असेल, तरी त्याला कोणतंही मोठं मिलिट्री ऑपरेशन न करता आम्ही पकडू. मिलिट्री कमांडर्सला ISIS-K वर स्ट्राईक करण्याचा प्लॅ करण्यास सांगण्यात आलंय. आता जागाही आम्ही निवडलेली असेल आणि वेळही, तिथेच हल्लेखोरांना उत्तर देऊ,” असं मत बायडन यांनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचा :
Kabul Airport Attack: ‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान
काबुल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने बचाव मोहीम थांबवली
VIDEO : अखेर ज्याची भीती होती ते घडलं, काबूल विमानळावर दोन बॉम्बस्फोट, आयसीसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
व्हिडीओ पाहा :
America take revenge of Kabul Airport Blast by Airstrike on ISIS-K