मी कोणत्या पातळीवर जाऊ शकते, याचा तू विचारही करू शकत नाहीस; अंजू हिने दिली नवऱ्याला धमकी
पाकिस्तानच्या एका उद्योगपतीने अंजूला एक प्लॉट दिला आहे. मदत म्हणून तिला एक चेही दिला आहे. तसेच अंजूला त्याच्या कंपनीत नोकरी देण्याचं आश्वासनही दिलं आहे. मोहसीन खान अब्बासी असं या उद्योगपतीचं नाव आहे.
कराची | 30 जुलै 2023 : आपला नवरा, मुलं आणि आईवडिलांना सोडून थेट पाकिस्तानात गेलेल्या आणि तिथे एका तरुणासोतब निकाह करणाऱ्या अंजू हिने पहिला पती अरविंद याला धमकावलं आहे. अंजूने अरविंदशी फोनवरून संवाद साधला. त्याला धमक्या दिल्या. मी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते. मी काय करू शकते याचा तू विचारही करू शकत नाही, अशी धमकीच तिने अरविंदला दिली. यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.
अंजू आणि अरविंदचा संवाद
अंजू : मी मुलांसाठी येणार आहे. मी सर्वांना पाहिलं आहे.
अरविंद : माझ्याशी बोलूच नको.
अंजू : मी बोलतोय. तुम्ही काय बडबड करत आहात. काहीही वायफळ बोलत आहात. जरा स्वत:बद्दल सांगा. काय माणूस आहात तुम्ही?
अरविंद : मला तुझं काहीच ऐकायचं नाही. आता तुला माझी आठवण आली का? तिकडे तर तू साखरपुडाही केलास. पाकिस्तानात नाचत आहेस. तू माझ्याशी योग्य वागलीस का?
अंजू : तू मीडियासमोर नाचत आहेस.
अरविंद : मग तू काय केले? तिकडे साखरपुडा केला. तिकडे तू फिरत आहेस.
अंजू : माझी मर्जी. मी काहीही करेल.
अरविंद : मर तिकडे. माझ्यासाठी तू मेलीस.
अंजू : घाणेरडा माणूस. थू तुझ्यावर…
अरविंद : थांब. फक्त काही दिवस नाचशील. नंतर तुझीही चौकशी होईल.
यावेळी दोघांनी एकमेकांचा चांगलाच उद्धार केला. यावेळी अंजूने अरविंदला धमकीच दिली. मी कोणत्या स्तराला जाऊ शकते याची तू कल्पनाही करू शकत नाही, अशी धमकीच तिने दिली. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
इस्लामचा स्वीकार
पाकिस्तानी मीडियानुसार अंजूने धर्मांतर केलं आहे. तिने इस्लामचा स्वीकार केला असून तिचं नाव फातिमा ठेवण्यात आलं आहे. जिल्हा न्यायालयात त्यांचं लग्न झालं आहे. मालकुंड डिव्हिजनचे डिआयजी नासिर महमूद दस्ती यांनी अंजू आणि नसरुल्लाह यांच्या लग्नाला दुजोरा दिला आहे. लग्नानंतर दोघेही पोलीस सुरक्षेत घरी पोहोचले होते.
प्लॉट आणि नोकरी मिळणार
पाकिस्तानच्या एका उद्योगपतीने अंजूला एक प्लॉट दिला आहे. मदत म्हणून तिला एक चेही दिला आहे. तसेच अंजूला त्याच्या कंपनीत नोकरी देण्याचं आश्वासनही दिलं आहे. मोहसीन खान अब्बासी असं या उद्योगपतीचं नाव आहे. ते पाक स्टार ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ आहेत. दुसऱ्या देशातून आलेल्या महिलेने इस्लाम स्वीकारला आहे. त्यामुळे तिची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तिला आम्ही घर बसल्या पगार देणार आहोत, असं अब्बासी यांनी सांगितलं. अब्बासी यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.