सुनीता विल्यम्स फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतराळात काय करणार, त्यापूर्वी परतण्याची शक्यता आहे का? NASA ने दिले अपडेट

Sunita Williams: स्पेस क्रू-9 मिशन 24 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. यामध्ये सुनीता आणि बूच स्पेश स्टेशनबाहेर स्पेसवॉक, प्रयोगशाळेत सुधारणा आणि विविध प्रयोग करणार आहेत. स्पेस क्रू-9 मधून चार अंतराळवीर जाणार होते. परंतु नासाच्या नव्या घोषणेनंतर या मोहिमेतील दोन अंतराळवीरांना उड्डाण करता येणार नाही.

सुनीता विल्यम्स फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतराळात काय करणार, त्यापूर्वी परतण्याची शक्यता आहे का? NASA ने दिले अपडेट
Sunita Williams
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 12:07 PM

Sunita Williams: भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. 5 जून रोजी हे दोघे अंतराळवीर अंतराळात गेले तेव्हा त्यांना 13 जून रोजी परतण्याचा निर्णय झाला होता. परंतु त्यांचा मुक्काम वाढला आहे. त्यांनी विचारही केला नसणार इतका दीर्घ मुक्कम त्यांचा अंतराळात होणार आहे. बोइंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा मुक्कम फेब्रुवारी 2025 पर्यंत लांबणार आहे. आता या दोघं अंतराळविरांना स्पेसएक्सच्या ड्रॅगनच्या माध्यमातून परत आणले जाणार आहे. अमेरिकीची अंतराळ संस्था नासाने माध्यमांना ही माहिती दिली. दोन्ही अंतराळविरांच्या सुरक्षितेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे नासाने म्हटले आहेच.

स्टारलाइनरला विश्वास पण…

स्टारलाइनरचा थ्रस्टर फेल झाला. यामुळे अनेक ठिकाणी हिलियम बाहेर पडू लागले. बोइंगच्या अभियंत्यांनी हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु त्यानंतरही हा दोष पूर्णपणे दूर झाला नाही. यामुळे नासाने अंतराळविरांच्या सुरक्षितेसाठी त्यांना स्टारलाइनरने पृथ्वीकडे आणण्याचा निर्णय रद्द केला. दुसरीकडे स्टारलाइनर बनवणारी बोइंगला आपल्या स्पेसक्राफ्टवर 100 टक्के विश्वास आहे. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकातच थांबणार असून नासाच्या पुढील मोहिमेचा भाग बनणार आहे.

हे सुद्धा वाचा

क्रू-9 मिशन 24 सप्टेंबर रोजी

सध्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकात पाहुण्यांसारखे आहेत. ते मिशन-71 चा भाग नाहीत. मिशन 71 मध्ये सात अंतराळवीर स्पेस स्टेशनचे अधिकृत कर्मचारी म्हणून काम करत आहेत. सध्या सुनीता विल्यम्स अन् बुच विल्मोर स्पेस स्टेशनच्या प्रयोगशाळेत दैनंदिन कामे हाताळत आहेत. हे दोघे आता अधिकृतपणे SpaceX च्या क्रू-9 मिशनशी जोडले जातील. NASA चे क्रू-9 मिशन 24 सप्टेंबर रोजी SpaceX च्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. क्रू-9 मिशनचा एक भाग म्हणून, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेसवॉक, प्रयोगशाळा दुरुस्ती आणि स्पेस स्टेशनच्या बाहेर विज्ञान प्रयोग यासारखी कामे करावी लागतील.

स्पेस क्रू-9 मिशनचा भाग असणार

स्पेस क्रू-9 मिशन 24 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. यामध्ये सुनीता आणि बूच स्पेश स्टेशनबाहेर स्पेसवॉक, प्रयोगशाळेत सुधारणा आणि विविध प्रयोग करणार आहेत. स्पेस क्रू-9 मधून चार अंतराळवीर जाणार होते. परंतु नासाच्या नव्या घोषणेनंतर या मोहिमेतील दोन अंतराळवीरांना उड्डाण करता येणार नाही. त्यांच्याऐवजी सुनीला आणि बूच या मोहिमेत असणार आहे. म्हणजे आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता आणि बूट यांना पृथ्वीवर परत येण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे.

हे ही वाचा…

सुनीता विल्यम्सला अंतराळातून भारत सुरक्षित आणणार का? इस्त्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले, सध्या…

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.