बांग्लादेशात मंदिरांवरील हल्ले सुरुच, इस्कॉनच्या प्रार्थनास्थळावर जमावाकडून हल्ला, एका भक्ताचा मृत्यू
बांग्लादेशातील मंदिरांवरील हल्ले सुरुच आहेत. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मंदिरांवर हल्ले झाले आहेत. बांग्लादेशच्या नौखाली जिल्ह्यात शुक्रवारी कथित समुदायानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला.
ढाका: बांग्लादेशातील मंदिरांवरील हल्ले सुरुच आहेत. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मंदिरांवर हल्ले झाले आहेत. बांग्लादेशच्या नौखाली जिल्ह्यात शुक्रवारी कथित समुदायानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. या घटनेची माहिती बांग्लादेशातील इस्कॉन समुदायानं ट्विट करुन दिली आहे. इस्कॉन मंदिरावर झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जीव गेला आहे. गुरुवारी बांग्लादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये काही समाजकंटकांनी हल्ला करत हिंदू मंदिरात तोडफोड केली होती यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
ISKCON temple & devotees violently attacked in Noakhali, Bangladesh. Temple suffered significant damage & the condition of a devotee remains critical.
We call on the Govt of Bangladesh to ensure the safety of all Hindus & bring the perpetrators to justice.@narendramodi
— Iskcon,Inc. (@IskconInc) October 15, 2021
200 जणांच्या जमावाचा हल्ला
इस्कॉन समुदायाच्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करुन माहिती देण्यात आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं, अशी मागणी करण्यात आलूी आहे. इस्कॉननं आमचे सदस्य पार्ध दास यांच्या मृत्यूची बातमी अत्यंत शोकाकूल स्थितीत देत असल्याचं म्हटलं आहे. पार्थ दास यांना 200 लोकांच्या समुदायानं हल्ला करत जीव घेतला. इस्कॉन समुदायानं बांग्लादेश सरकारकडे या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नौखालीतील इस्कॉन मंदिर आणि भक्तांवर समुदायानं हल्ला केला. यामुळं मंदिराचं मोठं नुकसान झालं असून आणखी एका भक्ताची स्थिती गंभीर आहे. बांग्लादेश सरकारनं सर्व हिंदू समुदायाला सुरक्षा देण्यासंदर्भात आणि दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी इस्कॉन समुदायानं केली आहे.
शेख हसीनांच्या आश्वासनानंतर हल्ले सुरुच
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देत हिंदू समुदायाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही बांग्लादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच आहेत. शेख हसीना यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करणाऱ्यांना पकडून कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांग्लादेशातील हिंदू मंदिरांच्या सुरक्षेसाठी देशभरातील मंदिरांच्या बाहेर अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
22 जिल्ह्यात सुरक्षाबल तैनात
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशातील 22 जिल्ह्यातील मंदिरांबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यामध्ये चांदपूर, बंदरबन, सिलहट, चटगांव, आणि गाजीपूर जिल्ह्यंचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. बांग्लादेश सरकारनं बॉर्डर गार्ड बांग्लादेशच्या जवानांना सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात केलं आहे. बीजीबीच्या ऑपरेशन डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल फैजूर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाच्या आदेशानं बीजीबीचे जवान सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
इतर बातम्या:
बांग्लादेशात दुर्गा पूजा उत्सवावर समाजकंटकांचे हल्ले, पंतप्रधान शेख हसीनांचा भारताला इशारा
अफगाणिस्तान : कंदहारच्या शिया मशिदीत 3 साखळी स्फोट, हल्ल्यात 32 जण ठार झाल्याची माहिती
Bangladesh Noakhali District violence at ISKCON temple vandalised 1 killed