Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?

या प्रकरणात आता दोन जणांनी हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल कबुली दिलीय. फेसबुक पोस्टमुळे 17 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजेदरम्यान दंगे पेटले.

Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?
voilence image for representation only
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:34 PM

बांगलादेशमध्ये  (Bangladesh) अलीकडील दिवसांपासून अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात (Voilence against Hindus) दंगे पेटलेत, ज्यात सुमारे 70 हिंदूंची घरे जाळण्यात आली होती. या प्रकरणात आता दोन जणांनी हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल कबुली दिलीय. फेसबुक पोस्टमुळे 17 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजेदरम्यान दंगे पेटले. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, मुख्य संशयित शौकत मंडल आणि त्याचा सहयोगी रबिउल इस्लाम यांनी मॅजिस्ट्रेट समोर ही कबुली दिली.

कोण आहेत हे आरोपी?

ती फेसबुक पोस्ट शौकतची होती आणि त्याची सहयोगी रबिउल इस्लाम हा मौलवी असून, त्याचावर जाळपोळ आणि दरोड्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, “शौकत आणि त्याचा सहकारी रबिउल इस्लाम यांनी वरिष्ठ न्यायदंडाधिकारी देलवार हुसैन यांच्यासमोर (उत्तर-पश्चिम) रंगपूरमध्ये त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली.” पोलिसांनी त्यांना शुक्रवारी गाजीपूरमधून अटक केली आणि डिजीटल सुरक्षा कायद्यानुसार तक्रार दाखल केली.

शौकत रंगपूरच्या कारमायकेल महाविद्यालयात दर्शनशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि अटकेनंतर त्याला सत्ताधारी अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेमधून काढून टाकण्यात आले. बीडी न्यूज 24 डॉट कॉममधील एका रिपोर्टमध्ये रॅपिड अॅक्शन बटालियनच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्याने त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी फॉलोवर्स आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला होता.

683 जणांना अटक

अधिकाऱ्याने सांगितले की, इस्लामने शुक्रवारी लाऊडस्पीकरच्या घोषणांद्वारे गावात मुस्लिमांना भडकावण्यात शौकतची मदत केली. असं म्हटले जाते की, अफवा पसरल्यानंतर हिंसाचार झाला, असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला. एका हिंदू व्यक्तीने फेसबुकवर धार्मिक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात सुमारे 70 हिंदू घरे जाळण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, कायदेशीर कारवाई अंतर्गत आतापर्यंत किमान सात जणांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली. हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 24,000 संशयितांवर आरोप ठेवण्यात आले असून, 683 लोकांना अटक करण्यात आली. यासंदर्भात 70 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेत.

इतर बातम्या 

‘फेसबुक फ्रेंड’च्या भेटीसाठी बंगळुरूहून औरंगाबादेत आली मैत्रीण, मित्राच्या घरीही पोहचली, पण… काय घडलं पुढे?

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

(bangladesh voilence against hindus two people arrested for facebook post)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.