बराक ओबामांची ती बोचणारी टीका, मग उद्योगपती असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवले राष्ट्रध्यक्ष बनायचं
trump and obama: 30 एप्रिल 2011 मध्ये व्हॉइट हाउसमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक डिनर पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत ओबामा वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करत होते. त्यावेळी ट्रम्प आणि राजकारण यांचा काही संबंध नव्हता. ते उद्योग जगात होते.
Donald Trump And Obama:अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला. परंतु डोनाल्ड ट्रम्प मुळात राजकीय व्यक्तीमत्व नव्हते. ते उद्योग जगातील यशस्वी व्यक्तीमत्व होते. परंतु एका घटनेने त्यांना राजकारणात आणले. मग राजकारणात यश असे मिळवले की सरळ दोन वेळा सर्वशक्तीमान अमेरिकेचे राष्ट्रध्यक्षपद सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला.
ओबामांनी केली टीका अन् ट्रम्प यांनी ठरवले…
30 एप्रिल 2011 मध्ये व्हॉइट हाउसमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक डिनर पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत ओबामा वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करत होते. त्यावेळी ट्रम्प आणि राजकारण यांचा काही संबंध नव्हता. ते उद्योग जगात होते. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी रिपब्लिकन पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर ट्रम्प ओबामा यांच्या जन्मावरुन प्रश्न उपस्थित करत होते. यामुळे ज्यावेळी ओबामा यांनी त्यांना डीनर पार्टीत पाहिले तेव्हा त्यांच्यावर पलटवार करण्याची संधी सोडली नाही.
ओबामी यांनी व्हाईट हाऊसमधील पार्टीत ट्रम्प यांच्यावर टीका केली. ती टीका ट्रम्प यांना सहन झाली नाही. त्याच दिवशी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बनवण्याचा निश्चिय केला. त्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष बनले. ट्रम्प हे मूळ अमेरिकन नाही. त्यांचे अजोबा फ्रेडरिक हे जर्मनीत राहत होते. फ्रेडरीक आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. यामुळे त्यांनी सलूनचा व्यवसाय सुरु केला. मग 16 वर्षांचे असताना ते अमेरिकेत आले. कारण जर्मनीत कमीत कमी तीन वर्ष लष्करात भरती होण्याचा कायदा केला होता. यामुळे 1885 मध्ये फ्रेडरिक अमेरिकेत निघून आले. अमेरिकेत आल्यावर त्यांनी काम सुरु केले. त्यानंतर खनन उद्योगात ते उतरले.
काही वर्षांतच ते श्रीमंत झाले. त्यांचे लग्न झाले. त्यानंतर ट्रम्प दाम्पत्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांना जन्म दिला. फ्रेड ट्रम्प यांनी उद्योग आणखी नवीन उंचीवर नेला. 1927 मध्ये फ्रेड यांनी त्यांच्या आईच्या नावाने एक रिअल एस्टेट कंपनी ‘एलिजाबेथ ट्रम्प एंड सन’ सुरु केली. त्यानंतर न्यूयॉर्कमधील सर्वात यशस्वी उद्योगपती ते बनले. 14 जून 1946 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला. वडिलांच्या व्यवसायामुळे डोनाल्ड ट्रम्प 8 वर्षांचे असताना कोट्यधीश झाले होते.