हमासने तिची नग्न परेड काढली मग तिला ठार केले, गाझामध्ये सापडला जर्मन तरुणीचा मृतदेह
हमासकडून करण्यात आलेल्या क्रुर कृत्याची आणखी एक घटना पुढे आली आहे. हमासने एका इवेंटमधून जर्मन तरुणीचं आधी अपहरण केले. तिची नग्न अवस्थेत परेड करण्यात आली. यानंतर आता या तरुणीचा मृतदेह गाझामध्ये आढळला आहे.
Israel – Hamas War : इस्रायलवर दहशतवादी संघटना हमासकडून हल्ल्या करण्यात आला. यादरम्यान त्यांनी अनेकांना ओलीस ठेवले. ज्यामध्ये जर्मन महिला शनी लौक या तरुणीचा ही समावेश होता. पण आता आलेल्या माहितीनुसार या तरुणीचा मृतदेह गाझामध्ये सापडला आहे. इस्रायली सैनिकांना शनी लौकचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे. सुपरनोव्हा म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान हमासने 23 वर्षीय शनी लौकला आपल्या सोबत नेले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी शनी लौकची नग्न परेडही केली होती. शनीची बहीण आदि लौक हिने आपल्या बहिणीची हत्या झाल्याची पुष्टी केली आहे.
शनी लौकची आई रिकार्डा लौक यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात ओलिस ठेवलेल्या शनी लौकची मुक्तता करण्यासाठी जर्मन आणि इस्रायली सरकारला आवाहन केले होते. सोशल मीडियावरही ती सतत आवाहन करत राहिली.
23 वर्षीय शनी लौकला पिक-अप ट्रकमध्ये नग्नावस्थेत नेण्यात आले. हमासने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तसे दिसत आहे. लौकच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिची ओळख तिच्या केसांमुळे आणि विशेष टॅटूवरून झाली.
🚨‼️ O corpo da mulher morta por terroristas palestinos que foi visto neste vídeo é de Shani Louk, de 30 anos, era uma cidadã alemã que visitava Israel para participar do festival de música pela paz realizado perto da fronteira de Gaza. #Israel #Gazapic.twitter.com/zwqDFsKJOM
— AMTVNEWS (@AMTVNEWSS) October 8, 2023
इस्रायलकडून मृत्यूची नोंद
इस्रायलने शनी लौकच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, शनीचे एका मैफिलीतून अपहरण करण्यात आले होते. गाझाभोवती हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा छळ केला. तिची न्यूड परेड करण्यात आली. तिने कमालीची भीषणता अनुभवली. आम्हाला कळवताना दुःख होत आहे की 23 वर्षीय जर्मन शनी लौकचा मृतदेह सापडला आहे आणि तिची ओळख पटली आहे.