AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BombBlast: एकामागून एक पाच स्फोटांनी लाहोर हादरलं, जमिनीत दीड फुटांचा खड्डा, 5 मृत्यू, 20 जण जखमी,

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटांमुळे जमिनीत तब्बल दीड फूट खोल खड्डा झाला. या स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना लाहौरमधील मायो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

BombBlast: एकामागून एक पाच स्फोटांनी लाहोर हादरलं, जमिनीत दीड फुटांचा खड्डा, 5 मृत्यू, 20 जण जखमी,
लाहौरमध्ये स्फोटांची मालिका
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 6:27 PM
Share

लाहौरः गुरुवारी पाकिस्तानमधील लाहौर (Lahore Blast) शहरात एकामागून एक अशा पाच बॉम्बस्फोट झाले. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 20 जण गंभीर खमी झाले आहेत. लाहौर शहरातील लाहौरी गेटजवळ हे स्फोट झाले. स्फोटांची (Pakistan Blast) तीव्रता एवढी भीषण होती की, परिसरातील दुकाने आणि इमारतींच्या खिडक्याही फुटल्या. रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटरसायकलींचेही नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून बचतकार्यही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या हल्ल्यानंतर परिसरातील अनारकली बाजार बंद करण्यात आला आहे. या बाजारातही बॉम्ब ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्फोटांमुळे जमिनीत दीड फूट खड्डा

लहौर ऑपरेशनचे उप महानिरीक्षक डॉ. मुहम्मद आबिद खान यांनी जियो न्यूजला सांगितले की, सध्या हा तपास सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र लवकरच या स्फोटांमागे कोण आहे आणि त्याचे कारण स्पष्ट होईल. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटांमुळे जमिनीत तब्बल दीड फूट खोल खड्डा झाला. या स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना लाहौरमधील मायो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे बॉम्ब घटनास्थळावर पूर्वीपासूनच प्लांट करण्यात आले होते. लाहौरी गेटजवळ दररोज मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी येत असतात.

घटनास्थळाला पोलिसांचा घेराव

दरम्यान, घटनास्ळास्थळावर पोलीस आणि प्रशासनाने घेराव घातला असून आणखी पुरावे गोळा केले जात आहेत. स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब IED होते की टाइम बॉम्ब होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये घटनास्थळावरील बचाव कार्याची दृश्य पाहता येतील. या स्फोटामुळे घटनास्थळावरील मोटरसायकललाही आग लागली. काही वेळातच ही आग विझवण्यात आली. दरम्यान मायो रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

इतर बातम्या-

Virat Kohli: चिडलेले गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, नवीन धक्कादायक खुलासा

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.