AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-Ukraine War: पत्नीला पक्षी निरीक्षणाला जातोय सांगून पठ्ठ्या थेट युक्रेनला पोहोचला, कारण वाचून तुम्हीही चक्रवाल

रशिया-युक्रेन युद्धाच्या दाहकता आणि उद्ध्वस्ततेच्या जशा बातम्या येत आहेत. तशा काही चांगल्या बातम्याही येत आहेत. अनेक देशांनी आता रशियाच्या दादागिरीला न जुमानता अनेक देश युक्रेनला मदत करताना दिसत आहेत.

Russia-Ukraine War: पत्नीला पक्षी निरीक्षणाला जातोय सांगून पठ्ठ्या थेट युक्रेनला पोहोचला, कारण वाचून तुम्हीही चक्रवाल
पत्नीला पक्षी निरीक्षणाला जातोय सांगून पठ्ठ्या थेट युक्रेनला पोहोचला, कारण वाचून तुम्हीही चक्रवाल Image Credit source: AP/PTI
| Updated on: Mar 05, 2022 | 6:09 PM
Share

क्यीव: रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War)  दाहकता आणि उद्ध्वस्ततेच्या जशा बातम्या येत आहेत. तशा काही चांगल्या बातम्याही येत आहेत. अनेक देशांनी आता रशियाच्या (Russia) दादागिरीला न जुमानता अनेक देश युक्रेनला मदत करताना दिसत आहेत. एका ब्रिटीश (british) नागरिकाने तर पत्नीला पक्षी निरीक्षणासाठी फिरायला जातो सांगून घर सोडलं अन् थेट युक्रेनच गाठलं. पत्नीला पक्षी निरीक्षणाला जातो असं खोटं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर फ्लाईट पकडून थेट पोलंडला गेला. तिथून मजल दरमजल करत त्याने पोलंड-युक्रेनची सीमा गाठली अन् कसाबसा युक्रेनमध्ये प्रवेश मिळवला. युक्रेनमध्ये आल्यावर युक्रेनच्या सैनिकांना मदत करण्याचं काम तो करत आहे. रशियाच्या विरोधात मदत युक्रेनला मदत व्हावी म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे.

‘द सन’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. हा ब्रिटीश नागरीक माजी सैनिक आहे. ब्रिटनच्या विरल येथे तो राहतो. आजूबाजूला फिरून येतो. पक्ष्यांचं निरीक्षण करून येतो असं सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्याने घरातून बाहेर पडताच थेट विमानतळ गाठलं आणि विमानाने पोलंडला आला. त्यानंतर बॉर्डर पार करून युक्रेनमध्ये त्याने प्रवेश केला. युक्रेनच्या सैनिकांची मदत करण्यासाठी आपण युक्रेनला आल्याचं त्याने सांगितलं.

पत्नीला फोन करून सर्व सांगेन

त्याने आपलं नाव सांगितलं नाही. पण त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. युक्रेनमध्ये युद्धात भाग घेण्यासाठी आपण आल्याचं कळलं तर पत्नी घाबरून जाईल, असं सांगून त्याने नाव सांगण्यास नकार दिला. मात्र, लवकरच पत्नीला फोन करून सर्व माहिती देईन. तिची समजूत काढेल, असंही त्याने सांगितलं.

अनेक ब्रिटीश नागरिक युक्रेनकडे रवाना

या व्यक्तीने ब्रिटीश आर्मीत अनेक वर्ष स्नाईपर म्हणून काम पाहिलं आहे. या कठिण प्रसंगात युक्रेनच्या नागरिकांना मदत केली पाहिजे. युक्रेनच्या नागरिकांना तात्काळ अनुभवी सैनिकांची गरज आहे. आपल्याकडे तो अनुभव आहे, असं त्याने सांगितलं. विशेष म्हणजे या व्यक्तीप्रमाणेच इतर अनेक ब्रिटीश नागरिकही ब्रिटनवरून युक्रेनमध्ये येत असून युक्रेनच्या सैनिकांना मदत करत आहेत.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Video: कोण म्हणतं पुतीनचं हेलिकॉप्टर पडत नाही? यूक्रेनच्या मिसाईलचा हा निशाणा तरी बघा !

युक्रेनमधून परतलेल्या MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी!

रशियाकडून युक्रेनमध्ये तूर्तास युद्धविराम, परदेशी नागरिकांना मायदेशी जाण्यासाठी मोठा निर्णय

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.