अमेरिकेतील चोरट्यांनी चक्क शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, पुणे शहराशी होते नाते

शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून सॅन जोस शहराला देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.

अमेरिकेतील चोरट्यांनी चक्क शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, पुणे शहराशी होते नाते
शिवाजी महाराजांचा हाच पुतळा चोरीला गेला आहेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 10:46 AM

न्यूयॉर्क : उत्तर अमेरिकेत एका उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Statue) एकमेव पुतळा चोरीला गेला आहे. पुणे शहरातील सिस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस शहरातील (Pune’s Sister City) उद्यानात ही घटना घडली.येथील गुआदाल्युप रिव्हर पार्कमधून हा पुतळा चोरीला गेला आहे. सॅन जोसच्या उद्यान विभागाने शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील मागितले आहे. नागरिकांनी चोरट्यांचा लवकर शोध घेऊन पुन्हा महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी केली आहे.

पुणे येथून गेलो होत पुतळा

हे सुद्धा वाचा

पुणे शहराने सॅन जोस शहराला भेट म्हणून दिला होता. सॅन जोस शहर हे पुणे शहरासारखे आहे. दोन्ही शहरांमधील अनेक गोष्टीत साधर्म्य आहे. दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आणि इतिहास आहे. दोन्ही शहरे शिक्षणाचे केंद्र आहेत. यामुळे सॅन जोस या शहराची ओळख पुणे सिस्टर सिटी म्हणून झाली.

परिणामी शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून सॅन जोस शहराला देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सॅन जोस शहरातील नागरिकांना खूप दुःख झाले आहे. आता या संदर्भात माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल, असेही उद्यान विभागाने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

जनतेला केले आवाहन

अमेरिकेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे शिवप्रेमी दु:खी झाले आहे. त्याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपासासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन देखील केले. पोलिसांनी जनतेकडून माहिती मागवली आहे.

अमेरिकेत शिवजयंती

न्यूयॉर्कमधील छत्रपती प्रतिष्ठानतर्फे अमेरिकेत दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. त्या छत्रपतींचा इतिहास अमेरिकेत मांडणे, वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो. शिवजयंती कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हानिया आणि मॅसेच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यांतूनही शिवभक्त येत असतात.

यावेळी अल्बानी ढोल-ताशा समूहाच्या कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेकाचे प्रयोग सादर केले जातात. यामुळे अमेरिकमधील भारतीय शिवाजी महाराजांशी आपले नाते कायम ठेवत असतात. आता पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सर्वांना दु:ख झाले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.