AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमा वादात चीनची चालाखी, थेट भारतात येऊनही आडमुठेपणा, बैठकीनंतर..

भारताने ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले. ब्रिक्सचे सदस्य असलेले देश या परिषदेत दाखल झाले. त्यातच चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्दिपक्षीय बैठक झाली. मात्र, चीनचा चालाखबाजी बघायला मिळाली.

सीमा वादात चीनची चालाखी, थेट भारतात येऊनही आडमुठेपणा, बैठकीनंतर..
Xi Jinping Narendra Modi
| Updated on: Sep 13, 2026 | 11:17 AM
Share

गलवान घाटीच्या वादानंतर चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग तब्बल सात वर्षानंतर भारत दाैऱ्यावर आले आहेत. सात वर्ष भारत आणि चीनमध्ये तणाव बघायला मिळाला. काही दिवसानंतर आता तणाव कमी झाला. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर चीनने भूमिका घेतली. अमेरिकेच्या विरोधात चीन मैदानात उतरला. ब्रिक्स परिषदेनिमित्त चीनचे अध्यक्ष भारतात आहेत. नरेंद्र मोदी आणि शी.जिनपिंग यांच्यात बैठक झाली. सीमा वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशात सहमती झाली. मात्र, दोन्ही देशांकडून आलेले विधान विरोधाभास दर्शवत आहेत. चीनने आपल्या विधानात दोन्ही देशातील व्दिपक्षीय संबंध पुढे नेण्याची आणि सीमेच्या मुद्द्यावरून चर्चा करून तोडगा काढण्याबद्दल भाष्य केले. सीमावर्ती भागात शांती ठेऊन दोन्ही बाजूंनी मजबूत प्रगती यावर काम करत असल्याचे चीनने म्हटले. चीनचे थोडक्यात म्हणणे आहे की, सीमावाद मिटण्यापूर्वी संबंध सामान्य ठेवले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीवर भर दिला की, सीमेवर शांती, स्थिरता आणि व्दिपक्षीय संबंध मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे. भारताने म्हटले की, दोन्ही नेत्यांनी व्दिपक्षीय संबंध आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन निष्पक्ष, योग्य आणि दोन्ही देशांनी एकत्र येऊन वाद मिटवावा. भारताचे स्पष्ट मत आहे की, सीमा संबंधित करार आणि सहमतीचे पूर्णपणे पालन केले पाहिते.

भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. काहींचे म्हणणे आहे की, चीन भारतीय क्षेत्रावर कब्जा करत आहे. आता दोन्ही देशांच्या विधानात फरक दिसत आहे. चीनचे म्हणणे आहे की, सीमा वाद सुरू असतानाही बाकी संबंध आपण व्यवस्थित ठेऊ शकतो. 2020 मधील गलवान झडपेनंतर भारताचे स्पष्ट आहे की, सीमेवर पूर्णपण शांती स्थापित होत नाही तोपर्यंत व्दिपक्षीय संबंध व्यवस्थित राहणार नाहीत.

भारताची स्पष्ट भूमिका आहे की, जोपर्यंत सीमेवर शांतता राहणार नाही, तोपर्यंत व्दिपक्षीय चर्चा शक्य नाही. मात्र, चीनचे म्हणणे आहे की, सीमेवरील तणाल मिटवत असताना व्दिपक्षीय चर्चा व्हायला पाहिजे. चीनने भारतात येऊनही चालबाजी केल्याचे दिसत आहे. आपलीच विधाने फिरवताना चीन दिसत आहे.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट