चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला

भारत आणि चीनमधील तणाव निवळण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर 2020मध्ये करार केला होता. (China breaks pact, quietly makes troop positions stronger in eastern Ladakh)

चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 7:23 PM

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव निवळण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर 2020मध्ये करार केला होता. मात्र कुरापतखोर चीनने या कराराचं उल्लंघन करणं सुरू केलं आहे. चीनने या कराराचा भंग करत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची जमावजमव केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. (China breaks pact, quietly makes troop positions stronger in eastern Ladakh)

चीनी सैन्याने 21 सप्टेंबर 2020 रोजी चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर संयुक्त निवेदन जारी केलं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यबळ न वाढवण्याचा आणि कुणाच्याही भूमीवर कब्जा न करण्याचं या निवेदनाद्वारे जारी करण्यात आलं होतं. यावेळी भारत आणि चीनने एकमेकांचा विश्वास घात न करता कराराचं पालन करण्याचाही निर्णय घेतला होता. आता चार महिने उलटत नाही तोच त्या निवेदनाच्या उलट भूमिका घेत चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्याची जुळवाजुळव केली आहे. चीनच्या या कुरापतीमुळे भारतासमोरही कोणताच पर्याय उरला नाही. त्यामुळे भारताने तणावग्रस्त भागात सैन्याची जुळवाजुळव केली आहे. काही सेक्टर्समधील चीनकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडूनही महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत.

नऊ महिन्यांपासून तणाव

गेल्या नऊ महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यानचा तणाव अधिकच वाढला आहे. दोन्हीकडून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रांनी सज्ज जवानांची तैनाती करण्यात आली आहे. भारताने आर्टिलरी गन, टँक, शस्त्रसज्ज वाहने सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी पँगाँग खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. पँगाँगवर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न होता. त्यामुळे दोन्ही देशातील सैनिक भिडले होते. परिणामी दोन्ही देशाचे सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यातही चिनी सैन्याने विश्वासघात करत पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. त्याला भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर दिलं होतं. या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे काही सैनिकही मारले गेले होते. (China breaks pact, quietly makes troop positions stronger in eastern Ladakh)

संबंधित बातम्या:

ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष म्हणतात, थँक्यू इंडिया, तेही संजीवनी घेऊन आलेल्या हनुमानाच्या फोटोसह, वाचा सविस्तर

व्‍लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्‍यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?

आमच्या जागेत आम्ही काहीही करु; अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्यानंतर चीनने दंड थोपटले

(China breaks pact, quietly makes troop positions stronger in eastern Ladakh)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.