युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कुरापतीः तैवानच्या हवाई हद्दीत चीनची फायटर जेट;रशिया-युक्रेन युद्धाचा चीन राजकीय फायदा उठवणार?

चीनकडून अनेकदा तैवानच्या हद्दीत लढाऊ विमानांचा प्रवेश होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून चीनकडून तैवानच्या हद्दीत विमानांचा वावर वाढला आहे. गेल्या एका महिन्यात चीनची फाईटर जेटकडून 12 वेळा हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कुरापतीः तैवानच्या हवाई हद्दीत चीनची फायटर जेट;रशिया-युक्रेन युद्धाचा चीन राजकीय फायदा उठवणार?
jet fighterImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 8:16 PM

नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेनमध्ये  (Russia-Ukraine)चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फायदा उठविण्याच्या तयारीत आहे. ज्या वेळी रशियाने पहिल्यांदा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा (Missile) मारा केला तेव्हा,तैवानच्या सीमेवर चीनची नऊ युद्धविमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे बोलले जात आहे. चीन आणि तैवानमध्ये (Taiwans) असलेला हा संघर्ष जगासाठी नवा नाही. चीनकडून अनेकदा तैवानच्या हद्दीत लढाऊ विमानांचा प्रवेश होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून चीनकडून तैवानच्या हद्दीत विमानांचा वावर वाढला आहे. गेल्या एका महिन्यात चीनची फाईटर जेटकडून 12 वेळा हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. चीनच्या या कुरापती वाढल्यामुळे आता तैवानला शंका येऊ लागली आहे की, चीनही रशिया आणि युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा उठवण्याच्या तयारीत असू शकतो आणि तैवानवर कधीही हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे तैवानही सतर्क झाला आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या देशात सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे तैवानकडून चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन आहे.

तैवान आता प्रचंड सतर्क झाला

रशिया आणि युक्रेनमध्ये चाललेल्या युद्धजन्य परिस्थिती चालू असतानाच गुरुवारी चीनकडून 9 लडाऊ विमाने तैवानच्या हवाई हद्दीत घुसवण्यात आली होती. त्यामुळे तैवान आता प्रचंड सतर्क झाला आहे, त्यामुळे आपल्या सुरक्षा वाढवली आहे. त्यानंतर लगेच चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानकडूनही आपले लढाऊ विमान पाठवून चीनला जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिला आहे. चीनचा हा वादाचा मुद्दा असला तरी, हवाई हद्दीचा प्रश्न येतो तेव्हा तो वायूसेनेकडे प्रस्तुत केला जातो. जेव्हा एखाद्या दुसऱ्या देशाचे विमान आपल्या हद्दीत दिसू लागते तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रन विभागाला आपली खरी ओळख द्यावी लागते.चीनकडून नेहमीच तैवानच्या या हद्दीवर आक्रमण केले जात आहे. या हवाई हद्दीत चीनने 30 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणे केली आहेत. चीनजवळ 17 फायटर आणि 17 स्पॉटर विमाने आहेत.

तैवानचे सैनिक सतर्क

आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की, चीनकडून तैवानच्या बाबतीत या कुरापती वाढू लागतात. त्यामुळे आताही रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा फायदा घेऊन चीनकडूनही आक्रमण होण्याची भीती तैवानला वाटू लागली आहे. या सर्व प्रकारामुळे चीनच्या धमकीनंतर तैवानने आपली सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी आधीच इशारा दिला आहे की चीन युक्रेनच्या संकटाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे चीनच्या प्रत्येक हालचालीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे मत जोसेफ यांनी सांगितले. संबंधित बातम्या

Russia Ukraine : तिरंगा हाती धरला अन् विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पहिली तुकडी रोमानियाच्या बॉर्डरकडे रवाना

Russia Ukraine War : शरणागतीशिवाय चर्चा नाही, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनचा प्रस्ताव फेटाळला!

बलाढ्य रशियासमोर युक्रेन हाताश; त्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचा कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्षपर्यंतचा प्रवास

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.