AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China Vs Taiwan : मिसाईल डागले, 100 फायटर जेट उडवले, चीनचा युद्धाभ्यास; तैवान म्हणाला, झुकेंगे नही, डरेंगे नही

China Vs Taiwan : चीनने तैवानला घाबरवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण तैवान चीनच्या समोर झुकण्यास तयार नाही. उलट तैवान आपल्या देशाच्या सुरक्षेवर वारंवार बोलत आहे. तैवान सध्या चीनच्या आसपासच्या परिसरात युद्धाभ्यास करत आहे.

China Vs Taiwan : मिसाईल डागले, 100 फायटर जेट उडवले, चीनचा युद्धाभ्यास; तैवान म्हणाला, झुकेंगे नही, डरेंगे नही
मिसाईल डागले, 100 फायटर जेट उडवले, चीनचा युद्धाभ्यास; तैवाण म्हणाला, झुकेंगे नही, डरेंगे नहीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2022 | 7:14 AM
Share

बीजिंग: गेल्या सहा महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका आहे. या युद्धामुळे जग दोन गटात विभागले गेले आहे. अजूनही या युद्धाचा शेवट ढालेला नाही. त्यामुळे जगाची चिंता वाढलेली असतानाच आणखी एका युद्धाचे ढग जमलेले आहे. चीन आणि तैवान दरम्यान (China Vs Taiwan) युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जगाची चिंता अजूनच वाढलेली आहे. तैवानला (Taiwan)धमकावण्यासाठी चीनने तर काल मिसाईल डागत आणि 100 फायटर जेट उडवत युद्धाभ्यास केला. चीनने (China) आपल्या लष्करी शक्तिचं प्रदर्शन करत तैवानला द्यायचा तो संदेश दिला. पण तैवाननेही चीनच्या या मॉक ड्रिलला भीख घातलेली नाही. डरेंगे नही, झुकेंगे नही, असं म्हणत तैवानने चीनच्या या युद्धाभ्यासाची खिल्ली उडवली आहे.

चीनची आदळआपट का?

चीनच्या ही आदळआपट समजून घेण्यासाठी चीनच्या खासदार नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा समजून घेतला पाहिजे. काही दिवसांपूर्वी नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली होती. तैवानकडून चीनच्या संप्रुभतेला धोका असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु अमेरिका आणि नॅन्सी पेलोसी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. नॅन्सी यांनी तैवानचा दौरा करून चीनला द्यायचा तो संदेशही दिला आहे. त्यामुळे चीन आणि तैवानमध्ये युद्ध भडकले आहे. मात्र, सध्या तरी ते शाब्दिक युद्ध आहे.

चीनच्या हालचाली वाढल्या

नॅन्सी यांच्या दौऱ्यानंतर चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने तैवानच्या सीमेवर युद्धाभ्यासास सुरुवात केली आहे. चीनने 100 फायटर जेट उडवले आहेत. त्या आधी बुधवारी 27 लढाऊ विमान तैवानच्या एअर झोनमध्ये दाखल झाले आहेत. गुरुवारी चीनने 11 बॅलेस्टिक मिसाईलही तैवानच्या आसपासच्या परिसरात डागण्यात आले आहेत. यातील पाच मिसाईल तर जापानमध्ये जाऊन लँड झाले आहेत. त्यामुळे चीन नंतर काय करेल याची काहीही शक्यता वर्तवण्यात येत नाही. चीनने सद्या तरी शक्तीप्रदर्शन सुरू केले असून तैवानला द्यायचा तो संदेश दिला आहे.

तैवान झुकणार नाही

चीनने तैवानला घाबरवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण तैवान चीनच्या समोर झुकण्यास तयार नाही. उलट तैवान आपल्या देशाच्या सुरक्षेवर वारंवार बोलत आहे. तैवान सध्या चीनच्या आसपासच्या परिसरात युद्धाभ्यास करत आहे. परंतु, बीजिंगने अशावेळी संयम ठेवायला हवं. तैवानला हा वाद वाढवायचा नाही. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या देशाची संप्रभुता आणि लोकशाहीचे रक्षण करू. कुणापुढेही झुकणार नाही, असं विधान तैवानच्या राष्ट्रपतींनी केलं आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.