Video : कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं चीनमध्ये काय घडतंय?
चीनमध्ये कोरोना संसर्गित लोकांना शी जिनपिंग यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून एका मोठ्या बॉक्समध्ये बंद करून ठेवण्यात आल्याचं बातम्यांमधून समोर आलं आहे.
बीजिंग: कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून (China) त्यांच्या नागरिकांवर दडपशाही सुरू असल्याचं कळतंय. चीनमध्ये कोरोना (Corona) संसर्गित लोकांना शी जिनपिंग यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून एका मोठ्या बॉक्समध्ये बंद करून ठेवण्यात आल्याचं बातम्यांमधून समोर आलं आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.आत्तापर्यंत दोन कोटी लोकांना चीनमध्ये क्वारंटाईनच्या नावाखाली कैद करुन ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेय. शी जिनपिंग यांनी शून्य कोविड धोरणांतर्गत (Zero Corona Policy) नागरिकांवर बंधन घालताना दडपशाहीच्या सीमापार केल्याचं देखील दिसून येत आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार लोकांना मोठमोठ्या बॉक्समध्ये क्वारंटाईन केले जातेय. डेली मेलने यासंदर्भात एक व्हिडिओदेखील जारी केलेला आहे. त्या रिपोर्टनुसार कोरोना संक्रमित रुग्णांना चीनच्या शीआन, आन्यांग आणि युझोऊ प्रांतांमध्ये लोखंडाच्या मोठ-मोठ्या बॉक्सेसमध्ये लोकांना क्वांरटाईन करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना देखील वेगवेगळ्या बॉक्समध्ये क्वारंटाईन करण्यात येतंय. नागरिक बाधित होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचे कळतेय.
पाहा व्हिडीओ
Millions of chinese people are living in covid quarantine camps now! 2022/1/9 pic.twitter.com/wO1cekQhps
— Songpinganq (@songpinganq) January 9, 2022
दोन कोटी लोक कैदेत
डेली मेलने दिलेल्या रिपोर्ट नुसार आणि इतर शहरांमध्ये जवळपास क्वारंटाईनच्या नावाखाली दोन कोटी लोकांना कैद करण्यात आलंय. शीआनमध्ये एक कोटी 30 लाख लोक त्यांच्या घरांमध्ये क्वारंटाईन आहेत. त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही. याशिवाय शेकडो लोकांना बॉक्स मध्ये बंद करण्यात आलेलं आहे. त्या बॉक्समध्ये शौचालयाची देखील सुविधा असून नागरिकांना दोन आठवडे त्या बॉक्समध्ये राहण्यास बंधनकारक करण्यात आलंय. डेली मेलच्या वृत्तानुसार चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये या गोष्टी दिसून येत आहेत.
Tianjin city Omicron arrived days ago. People are afraid of lockdown, So panic buying now. Please check my old thread.https://t.co/dpkpwcrJQi
2022/1/11 pic.twitter.com/uChbM3tqY2
— Songpinganq (@songpinganq) January 11, 2022
नियम मोडल्यास चार वर्ष तुरुंगवास
चीनी मिडिया ग्लोबल टाइम्स या रिपोर्टनुसार नियमांचे उल्लंघन केल्यास चार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे डालियान प्रांतातील लोक घाबरलेत. चिनी सरकारच्या झिरो कोरोना धोरणाविरोधात प्रश्न विचारू लागले आहेत. चीनच्या या धोरणांतर्गत इतकी कठोर शिक्षा कशासाठी असा सवाल नागरिक करत आहेत. तर, स्थानिक मीडियानं या संदर्भात माहिती दिली आहे. चार लोकांमुळे 83 लोक कोरोना बाधित झाले होते. डालियान शिवाय तियानजिन प्रांतातील एक कोटी 40 लाख लोक क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. याशिवाय बंधन आणखी कठोर करण्यात येत आहेत. तियानजीन गेल्या चोवीस तासात 33 कोरोना रुग्ण आढळले असून निर्बंध वाढवले जात आहेत. पुढील वर्षी बीजिंगमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक वर देखील कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे.
इतर बातम्या:
Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे हजारापेक्षा जास्त रुग्ण; काय आहे आजची नेमकी स्थिती?
Corona : कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, 27 टक्के रुग्णवाढ, 2 लाख 47 हजार रुग्णांची नोंद
China Quarantine update midnight evacuation of corona patient for quarantine in metal boxes china enforces zero covid policy