India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने पुन्हा एकदा भारतालाच दोषी ठरवलं आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops).
मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने पुन्हा एकदा भारतालाच दोषी ठरवलं आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops). गलवान संघर्षावर चीनकडून वारंवार वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. या सर्व दाव्यांमध्ये भारतालाच दोषी ठरवलं जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी आज ट्विटरवर आपली प्रतिक्रिया जारी करत भारताने चिनी सैन्याला कमी लेखू नये, असा इशारा दिला आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops).
“भारतीय सैनिकांनी वास्तविक नियंत्रण रेषा पार करत नियमांचं उल्लंघन केलं. याशिवाय त्यांनी चिनी सैनिक आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. भारताने वस्तुस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. याशिवाय भारताने चिनी सेनेला कमी लेखू नये”, असं हुआ चुनयिंग म्हणाल्या आहेत.
Indian front-line troops broke the consensus and crossed the Line of Actual Control, deliberately provoking and attacking Chinese officers and soldiers, thus triggering fierce physical conflicts and causing casualties.
— Hua Chunying 华春莹 (@SpokespersonCHN) June 18, 2020
India must not misjudge the current situation or underestimate China’s firm will to safeguard its territorial sovereignty.
— Hua Chunying 华春莹 (@SpokespersonCHN) June 18, 2020
भारत-चीन संघर्षावर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनीदेखील काल (17 जून) भारताला दोषी ठरवलं होतं. “गलवान आमचंच आहे, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं आणि भारतानं रुळावर यावं”, असं झाओ लिजैन म्हणाले होते. त्यापोठोपाठ आज हुआ चुनयिंग यांनी भारताला दोषी ठरवलं. दरम्यान, परिस्थिती शांत करण्यासाठी दोन्ही देश तयार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली आहे.
या संघर्षावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दोषी ठरवलं आहे. चीनने नियोजन करुन ही घटना घडवून आणली, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. याप्रकरणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर बोलून त्यांची कानउघाडणी केली.
जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी चीनला भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं. “भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही”, असं मोदी म्हणाले. याशिवाय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं म्हटलं आहे.
संबंधित बातमी :