ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष म्हणतात, थँक्यू इंडिया, तेही संजीवनी घेऊन आलेल्या हनुमानाच्या फोटोसह, वाचा सविस्तर
कोरोनाच्या या जीवघेण्या संसर्गाला कायमचं संपवण्यासाठी भारतानेही सगळ्या देशांना मदत पुरवली आहे. देशाच्या या मोलाच्या योगदानामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी भारताचं कौतूक केलं आहे.
मुंबई : कोव्हिशील्डच्या (Covishield) 20-20 लाख डोसने भरलेल्या दोन विमानं मुंबई विमानतळावरून (Mumbai Airpot) ब्राझील (Brazil) आणि मोरोक्कोला रवाना झाली. महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात मोठ्या औषधी उत्पादक देशांपैकी भारत (India) हा एक देश आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) लस खरेदी करण्यासाठी अनेक देशांनी भारताशी करार केला आहे. कोरोनाच्या या जीवघेण्या संसर्गाला कायमचं संपवण्यासाठी भारतानेही सगळ्या देशांना मदत पुरवली आहे. देशाच्या या मोलाच्या योगदानामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी भारताचं कौतूक केलं आहे. फक्त कौतूक नाही तर त्यांनी थेट हनुमान देवाला संजीवनी नेतानाचा फोटोही यावेळी त्यांनी ट्विट करत भारताचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. (corona vaccine news brazil jair bolsonaro said thanks to india pm narendra modi for corona vaccine)
ब्राझीलचे अध्यक्ष जैयर एम बोल्सनारो (Jair M Bolsonaro) यांनी यासंबंधी शुक्रवारी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. या साथीच्या काळात तुमच्यासारखा चांगल्या साथीदार मिळाल्यामुळे ब्राझीलला हा सन्मान वाटत आहे. कोरोना लस भारतातून ब्राझीलमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद. ” असं त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे. इककंच नाही तर त्यांनी हिंदीमध्ये धन्यवाद असंही लिहलं आहे.
– Namaskar, Primeiro Ministro @narendramodi
– O Brasil sente-se honrado em ter um grande parceiro para superar um obstáculo global. Obrigado por nos auxiliar com as exportações de vacinas da Índia para o Brasil.
– Dhanyavaad! धनयवाद pic.twitter.com/OalUTnB5p8
— Jair M. Bolsonaro (@jairbolsonaro) January 22, 2021
बोल्सनारो यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र
सगळ्यात विशेष बाब म्हणजे जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनी अॅस्ट्रॅजेनेका लस खरेदीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी भारताला लवकरात लवकर 20 लाख डोस देशात पाठवण्याची विनंती केली होती. मिळालेल्या अहवालानुसार, वेळीच लस उपलब्ध न झाल्यामुळे ब्राझील इतर प्रादेशिक देशांच्या तुलनेत लसीकरणात मागे पडला होता. पण अखेर भारताच्या मदतीने तिथे आरोग्य सेवा सुरळीत झाली आहे.
लसीचे 20 लाख डोस ब्राझीलमध्ये पोहोचले
सीएसएमआयएने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) इथून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोव्हिशील्ड लसीचे तब्बल 20 लाख डोस घेऊन जाणारं एक विमान ब्राझीलला आणि मोरोक्कोला पोहोचलं आहे.
मोदींनीही मानले बांगलादेशच्या पंतप्रधानांचे आभार
खरंतर, याआधी कोरोनाच्या लसीचे 20 लाखाहून अधिक डोस देशाला दिल्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. गुरुवारी भारताने ‘कोव्हिशील्ड’ लसीचे 20 लाख डोस बांगलादेशला दिले. यामुळे गुरुवारी ढाका विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषदेत शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस पाठवल्याबद्दल आभार मानले आहेत. (corona vaccine news brazil jair bolsonaro said thanks to india pm narendra modi for corona vaccine)
संबंधित बातम्या –
Serum Institute Fire : धक्कादायक! सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती; जे.जे. रुग्णालयात दिवसभरात 100 पैकी केवळ 13 जण लसीकरणास हजर
Covaxin लसीचे दुष्परिणाम आढळल्यास भरपाई, भारत बायोटेकची मोठी घोषणा
(corona vaccine news brazil jair bolsonaro said thanks to india pm narendra modi for corona vaccine)