जगातील सर्वाधिक काळ लॉकडाऊन, जनतेसाठी सर्व काही बंद, दिलासा कधी मिळणार

वैश्विक महामारी कोरोना विषाणू संसर्गामुळं संपूर्ण जगभरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. जगातील सर्व नागरिकांच्या जीवनावर कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रभाव पडला आहे. कोरोनाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी विविध देशांनी लॉकडाऊन केलं होतं.

जगातील सर्वाधिक काळ लॉकडाऊन, जनतेसाठी सर्व काही बंद, दिलासा कधी मिळणार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 3:54 PM

नवी दिल्ली: वैश्विक महामारी कोरोना विषाणू संसर्गामुळं संपूर्ण जगभरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. जगातील सर्व नागरिकांच्या जीवनावर कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रभाव पडला आहे. कोरोनाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी विविध देशांनी लॉकडाऊन केलं होतं. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार केल्यानंतर विविध देशांनी लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यास सुरुवात केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियानं अद्याप लॉकडाऊन शिथील केलेलं नाही. तिथल्या जनतेनं जगातील सर्वाधिक काळ चाललेल्या लॉकडाऊनचा सामना केला आहे. आता ऑस्ट्रेलिनय सरकार नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात विचार करत आहे.

लॉकडाऊनमधून दिलासा मिळणार?

मेलबर्न मधील अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात सर्व बंधन शिथील केली जाणार आहेत. मार्च 2020 नंतर ऑस्टेलियानं 262 दिवस म्हणजेच 9 महिन्यानंतर घरी राहावं लागलं होतं.ऑस्ट्रेलियातील कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. तेथील स्थिती सामान्य होण्यासाठी कोरोना लसीकरणाचं प्रमाण 70 टक्क्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे.

ऑस्ट्रेलियात रविवारी 1838 कोरोना रुग्ण आढळून आले होते तर 7 जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियाच्या 80 टक्के नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतर लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात विचार केला जाण्याची शक्यता आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते न्यूझीलंडमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. तिथं क्वारंटाईन फ्री प्रवासाला मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.

सिंगापूर ऑस्ट्रेलिया प्रवास सुरु?

ऑस्ट्रेलिा आणि सिंगापूरदरम्यान प्रवास सुरु करण्यासंदर्भात ऑस्ट्रेलियन सरकार सिंगापूर सरकारसोबत चर्चा करत आहेत. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहेत. इतर विकसित देशांपेक्षा ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णसंख्या कमी प्रमाणात आहे.

न्यूझीलंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट

न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणू संसर्ग संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता न्यूझीलंडमध्ये रविवारी 51 रुग्ण आढळून आले आहेत. तर, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण ऑकलंडमध्ये आढळले आहेत. तिथं, 47 रुग्णांची नोंद झालीय. न्यूझीलंडमध्ये ऑगस्ट महिन्यापासून लॉकडाऊन लावण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

रशियात पुन्हा कोरोनाचा कहर, एका दिवसांत 1000 लोकांचा मृत्यू, स्पुतनिक लसीलाही नागरिकांचा नकार

भारताच्या अंतरिम सरकारचे अर्थमंत्री, पाकचे पहिले पंतप्रधान, लियाकत अली खान यांचा इतिहास नेमका काय?

coronavirus latest update Australian government will gave relaxation from restrictions of coronavirus lockdown

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.