Covid Vaccine Update: कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीनं ट्रायल थांबवलं

याआधी आलेल्या लसीच्या रिपोर्टमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी ही लस अगदी उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. तर आतापर्यंत कोणत्याही रुग्णाला या लसीमुळे धोका झाला नव्हता.

Covid Vaccine Update: कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीनं ट्रायल थांबवलं
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 9:02 AM

वॉशिंग्टन : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसवर (Coronavirus) लस बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोविड रुग्णांची संख्या 71 लाखांच्या वर पोहोचली आहे. या जीवघेण्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी भारतात कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) विकसित करण्यासाठी संपूर्ण आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे. या दरम्यान, अमेरिकेच्या जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीने लसीचं ट्रायल थांबवलं आहे. लसीच्या अंतिम टप्प्यात चाचणी सुरू असताना एक रुग्ण आजारी पडल्याने तात्काळ ही लस थांबवण्यात आली आहे. (coronavirus vaccine johnson and johnson stop covid vaccine trial)

जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनकडून यांसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या सगळ्या कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल तात्पुरत्या थांबवत आहोत. लसीची रुग्णांवर चाचणी करताना रुग्ण आजारी पडल्याने ट्रायल थांबवलं असल्याचं कारण त्यांनी यावेळी दिलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनी अमेरिकेच्या वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये शॉर्ट लिस्ट झाली होती. या कंपनीची ‘एडी26-सीओवी2-एस’ लस ही अमेरिकेमध्ये चौथी अशी लस आहे, जी क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात पोहोचली होती. याआधी आलेल्या लसीच्या रिपोर्टमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी ही लस अगदी उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. तर आतापर्यंत कोणत्याही रुग्णाला या लसीमुळे धोका झाला नव्हता.

या कंपनीने नुकतंच लसीच्या ट्रायलचा अंतिम टप्पा सुरू केला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरूमध्ये 60 हजार लोकांवर या लसीचं ट्रायल करण्यात आलं आहे. अशात जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीचं ट्रायल थांबवण्यात येणं म्हणजे धक्कादायक बातमी आहे.

दरम्यान, कोरोनावर लसी बनवण्याच्या स्पर्धेत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस सगळ्यात पुढे आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये वॉलंटिअरची कोविशील्ड लस दिल्याने प्रकृती बिघडल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे 6 सप्टेंबर रोजी याचं ट्रायल थांबवण्यात आलं. खरंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीची चाचणी ब्रिटेन आणि भारतात पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली
पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता

(coronavirus vaccine johnson and johnson stop covid vaccine trial)

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.