5 लाख देऊन ऑनलाइन मागवलं मांजराचं पिल्लू, बॉक्स उघडताच फुटला घाम
ऑनलाइन सवाना ब्रिडच्या मांजरीचं पिल्लू ऑर्डर केलं. पण पार्सलमध्ये असं काही आलं की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरली.
पॅरिस : सोशल मीडियावर हल्ली अनेक बातम्या व्हायरल होत असतात. आताही एक असाच अजब प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन शॉपिंग तर तुम्ही करत असाल. यामध्ये अनेक वेळा पार्सलमध्ये चुकीच्या वस्तू सापडल्याचं तुम्ही वाचलंच असेल. पण आता घडलेल्या प्रकाराने संपूर्ण शहर हादरलं आहे. खरंतर, एका व्यक्तीला मांजर पाळण्याची खूप आवड होती. त्याला घरी मांजरीचं पिल्लू पाळायचं होतं. म्हणून त्याने ऑनलाइन सवाना ब्रिडच्या मांजरीचं पिल्लू ऑर्डर केलं. पण पार्सलमध्ये असं काही आलं की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. (couple online purchased cat but they actually get tiger cub french viral news)
मिळालेल्या माहितीनुसार, या मांजरीची किंमत पर 6 हजार यूरो (5 लाख रुपये) होती. व्यक्तीने ऑनलाइन पैसेही भरले होते. दुसऱ्या दिवशी ऑर्डर घरी आली. व्यक्तीने आनंदी होत बॉक्स उघडला तोच त्यामध्ये मांजराचं पिल्लू नाही तर वाघाचा बछडा (Tiger Cub) होता. ही घटना फ्रान्समध्ये समोर आली आहे.
ब्रिटेनचं वृत्तपत्र Daily Mailच्या माहितीनुसार, नॉरमँडीच्या एका अज्ञात जोडप्याने मांजराचं एक पिल्लू ऑनलाइन जाहिरात पाहून ऑर्ड केलं होतं. एक दिवसानंतर ऑर्डर घरी आली आणि त्या बॉक्समध्ये चक्क वाघाचा 3 महिन्याचा बछडा होता.
रिपोर्टनुसार, हे प्रकरण 2018 चं आहे. पण सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर, या जोडप्याला कळलंच नाही की ते मांजराचं नाही तर वाघाचा बछडा आहे. काही दिवसांनी त्याच्या शरीरात झालेल्या बदलानंतर त्यांच्या ही बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि तपास सुरू झाला. तब्बल 2 वर्षानंतर या घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. बॉक्समध्ये मांजर नाही तर तो इंडोनेशियाचा एक सुमात्रा वाघ होता. पण त्या बॉक्समध्ये हे बछडा कसा आला याचा अद्यापही शोध लागलेला नाही.
इतर बातम्या –
महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?
VIDEO : Headline | 4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 12 PMhttps://t.co/OKmP6jlGAX
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2020
(couple online purchased cat but they actually get tiger cub french viral news)