पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन
परवेझ मुशर्रफ यांचे निधन
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 12:21 PM

लाहोर : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुशर्रफ दीर्घकाळपासून आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना अमायलोइडोसिस हा आजार होता. त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले आहेत.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, अमायलोइडोसिस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. या आजारामध्ये मानवी शरीरात अमायलोइड नावाचे असामान्य प्रथिने तयार होऊ लागतात. हृदय, मूत्रपिंड, यकृत, मज्जासंस्था, मेंदू इत्यादी अवयवांमध्ये ते जमा होऊ लागते. त्यामुळे हे अवयव काम करू शकत नाहीत.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म दिल्ली

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्यांचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले. ते परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित काम करत होते.

कारगील युद्धाला जबाबदार

2001 ते 2008 या कालखंडात मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी ते पाकिस्तानी लष्कराचे प्रमुखही होते. कारगील युद्धाला परवेझ मुशर्रफ हेच जबाबदार होते, असा आरोप अनेकदा त्यांच्यावर करण्यात आला. त्यांनी नवाज शरीफ यांना सत्तेतून पायउतारही केले होते. 1999 साली ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना पाकि्स्तानी सैन्याला भारताकडून कारगीलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

शरीफांशी झाले मतभेद

कारगीलच्या पराभवनानंतर तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1999 साली नवाझ शरीफ यांनी मुशर्रफ यांना लष्करप्रमुखपदावरुन पदच्युत केले. हे वृत्त कळताच मुशर्रफ यांनी शरीफ यांच्याविरोधात लष्करी बंड केले आणि सत्ता ताब्यात घेतली. 15 ऑक्टोबर 1999 रोजी मुशर्रफ यांनी पाकिस्तानात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर त्यांनी स्वता:ला राष्ट्रपती म्हणून जाहीर कले. नवाज शरीफ यांना अटक केली. त्यांना देश सोडण्यास भाग पाडले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.