सूर्यावर भीषण विस्फोट होणार, पृथ्वीवरील इंटरनेट, मोबाईल बंद पडणार…’नासा’ने सांगितले भारतावर काय होणार परिणाम
Massive Solar Storm May Hit to Earth: ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात सौर वादळाने झाली. सूर्याच्या पृष्ठभागावर 2 मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटामुळे आलेल्या वादळाला जिओमॅग्नेटिक वादळ किंवा स्ट्रोम (G3) म्हणतात. G3 वादळाचा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांवर परिणाम होऊ शकतो.
Massive Solar Storm May Hit to Earth: सूर्यावर भीषण विस्फोट होणार आहे. त्यामुळे मोठे सौर वादळ निर्माण होणार आहे. या वादळाचा परिणाम पृथ्वीवर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमेरिकेन अंतराळ संस्था नासाने अलर्ट दिले आहे. सौर वादळ पृथ्वीवर आदळले तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे रेडिओ ब्लॅकआउट आणि वीज ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सेवा बंद होऊ शकतात. पृथ्वीबरोबर समुद्रात वादळ निर्माण होण्याचा धोका आहे.
भारतावर काय परिणाम होणार
सूर्याच्या पृष्ठभागावरून दोन मोठ्या सौर ज्वाला बाहेर पडल्या आहेत. त्यांना कोरोनल मास इंजेक्शन म्हटले जाते. ते थेट पृथ्वीच्या दिशेने गेले आहेत. शास्त्रज्ञांनी त्यांना X7 आणि X9 अशी नावे दिली आहेत. X9 फ्लेअर हा गेल्या सात वर्षांतील सूर्यापासून निघणारा सर्वात शक्तिशाली फ्लेअर आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) सूर्यावर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेऊन असते. त्यासाठी लडाखमध्ये केंद्र बनवले आहे. त्या केंद्रातून सूर्यावर भीषण स्फोट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारतीय उपग्रहांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कारण हे सौर वादळामुळे उपग्रहाला धोका निर्माण होऊ शकते.
THIS WEEKEND Earth will be hit by a super-powerful solar storm, caused by yesterday's massive flare. Flares are ranked by letters (A, B, C. M, X) & numbers (1-9). This flare was a chart-topping X9! Expect radio blackouts, power grid surges & colorful auroas. #sciencewithdrg pic.twitter.com/CSHyLVh3bn
— Dr. Michael Guillén (@DrMGuillen) October 4, 2024
उष्णतेमुळे सूर्यावर स्फोट
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सौर वादळाचा भारतावर परिणाम होण्याचा ईशारा दिला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या संचालक डॉ अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांनी सांगितले की, कण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र आणि पदार्थ यांच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे सूर्यावर स्फोट होणार आहे. या स्फोटानंतर ताशी 250 ते 3000 किलोमीटर वेगाने सौर वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ते पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकते.
🚨🇺🇸#BREAKING | MAJOR X 9.0 SOLAR FLAIR HAS HIT TODAY THAT WILL CAUSE A GEO MAGNET STORM⚠️
POTENTIAL FOR LARGE AURORAS TONIGHT AND TOMORROW THE CME WAS EARTH DIRECTED 🌎⭕️🔥 pic.twitter.com/J7tASlZm9R
— Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) October 3, 2024
उत्तरी गोलार्धात दिसणार परिणाम
मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात सौर वादळाने झाली. सूर्याच्या पृष्ठभागावर 2 मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटामुळे आलेल्या वादळाला जिओमॅग्नेटिक वादळ किंवा स्ट्रोम (G3) म्हणतात. G3 वादळाचा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांवर परिणाम होऊ शकतो. या सौर वादळामुळे उत्तर गोलार्धात आकाश रंगीबेरंगी दिसू शकतो.