ऐकावं ते नवलंच! 16 बायकांचा दादला, 150 मुलं; तरीही गुडघ्याला बाशिंग बाधून तयार!

जगात कुणाचं काय आणि कुणाचं काय चालू असेल हे सांगता येत नाही. आता हेच पाह ना, दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीने दोन-चार नव्हे तर 16 स्त्रियांशी लग्न केलं आहे. त्याला 150 मुलंही आहेत. (Father of 151 children says his full-time job is ‘satisfying’ his 16 wives)

ऐकावं ते नवलंच! 16 बायकांचा दादला, 150 मुलं; तरीही गुडघ्याला बाशिंग बाधून तयार!
Misheck Nyandoro
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 3:04 PM

हरारे: जगात कुणाचं काय आणि कुणाचं काय चालू असेल हे सांगता येत नाही. आता हेच पाह ना, दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीने दोन-चार नव्हे तर 16 स्त्रियांशी लग्न केलं आहे. त्याला 150 मुलंही आहेत. पण एवढ्यावर थांबेल तर हा नवरोबा कसला? 16 बायका असतानाही आता 17वी बायको करण्यासाठी हा गडी सज्ज झाला आहे. वयाच्या 66व्या वर्षी गुडघ्याला बाशिंग बाधून असलेल्या या जगावेगळ्या नवरोबाची शंभर विवाह करण्याची इच्छा आहे. (Father of 151 children says his full-time job is ‘satisfying’ his 16 wives)

मिशेक न्यानदोरो असं या 66 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो झिम्बाब्वेच्या मशोनालँड प्रांताच्या बायर जिल्ह्यात राहतो. तो काहीच कामधंदा करत नाही. फक्त सर्व बायकांना संतुष्ट करणं हाच त्याचा जॉब आहे. त्याच्या वयोवृद्ध बायका त्याच्या सेक्स ड्राइव्हला मॅच करत नाहीत. म्हणून मला सतत तरुण मुलींशी लग्न करावं लागत आहे, असं या पठ्ठ्याचं म्हणणं आहे.

प्रत्येक रात्रीचं शेड्यूल अन् जगावेगळी इच्छा

मिशेकच्या इच्छाही त्याच्यासारख्याच हटके आहेत. मृत्यूपूर्वी एक हजार मुलं जन्माला घालायचीय असं त्याचं म्हणणं आहे. त्यासाठी त्याने एक शेड्यूल डिझाईन केलं आहे. त्या शेड्यूल नुसार तो रोज रात्री चार बायकांशी संबंध ठेवतो, अशी माहिती द हेराल्डने दिली आहे. माझ्या शेड्यूलप्रमाणे मी बेडरुममध्ये जात असतो. त्यानंतर एकीला संतुष्ट केल्यावर दुसरीच्या बेडरुममध्ये जातो. हाच माझा जॉब आहे. माझ्याकडे दुसरं काही कामच नाही, असं तो अभिमानाने सांगतो. माझ्या प्रत्येक पत्नीशी तिच्या वयानुसारच बेडरुममध्ये मी वागतो. वयस्क स्त्रियांशी जसो वागतो, तसं मी तरुणी पत्नीशी वागत नाही, असंही त्याने सांगितलं. मात्र, आपल्या वयोवृद्ध बायका आता पूर्वीसारखा सेक्समध्ये इंटरेस्ट घेत नसल्याची त्याची तक्रार आहे.

मुलं आर्मी आणि पोलीस दलात

150 मुलं असल्याने माझ्यावर कुणाचा दबाव पडला नाही. उलट त्यामुळे मला फायदाच झाला. कारण मला सतत मुलांकडून भेट वस्तू मिळत असतात, असं मिशेक म्हणतो. या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. मिशेकची सहा मुले झिम्बाब्वे नॅशनल आर्मीत काम करत आहेत. दोन मुले पोलीस दलात आहेत. तर 11 मुलं वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. तर त्याच्या 13 मुलींचे विवाह झाले आहेत.

देशासाठी लग्न करण्यास स्थगिती

त्याने 2015मध्ये शेवटचं लग्न केलं होतं. त्यानंतर त्याने काही काळासाठी लग्नापासून ब्रेक घेतला. त्याचं कारणही अजबच आहे. झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था ढासळली होती. म्हणून मिशेकने तूर्तास लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. आता 2021मध्ये त्याला 17वा विवाह करायचा आहे.

देशासाठी सर्व काही

त्याने झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्यासाठी 1964 ते 1979 पर्यंत रोडेशियन बूश वॉरमध्ये भाग घेतला होता. 1983पासूनच त्याने बहुविवाहचा हा आगळावेगळा प्रोजेक्ट सुरू केला. या युद्धात झिम्बाब्वेचं मोठं नुकसान झालं. तेव्हाच त्याने देशाची लोकसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच अधिकाधिक लग्न करण्याची कल्पना त्याला सूचली.

जेवण हवं तर स्वादिष्टच

माझी प्रत्येक बायको माझ्यासाठी रोज स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ बनवतात. मात्र, एखादी डिश मला आवडली नाही तर मी थेट फेकून देतो, असं त्याने सांगितलं. माझा हा नियम सर्व बायकांना माहीत आहे. मी जेवणाचं ताट परत पाठवल्यावर त्यांनी रागवायचं नाही असं वचन त्यांनी दिलं आहे. त्यांनी चांगलं जेवण बनवावं हा धडा त्यांना मिळावा म्हणूनच मी हा फंडा वापरला आहे, असंही त्याने सांगितलं. (Father of 151 children says his full-time job is ‘satisfying’ his 16 wives)

संबंधित बातम्या:

 87 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशाच्या चलनावर गणेशजींचा फोटो, जाणून घ्या यामागील कारण

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी

कोरोना संसर्ग हे चीनचं जैविक हत्यार?; सीक्रेट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा दावा

(Father of 151 children says his full-time job is ‘satisfying’ his 16 wives)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....