नवीनचा मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणू, परराष्ट्र मंत्रालयाकडून नवीनच्या कुटुंबीयांचं सांत्वन
युद्धजन्य परिस्थिती सुरु असतानाच आज रशियाने खारकीव्ह शहरावर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी ठार झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरद्वारे जाहीर केले.
मुंबईः रशियाकडून युक्रेनवर (Russia-Ukraine) होत असलेल्या हल्ल्यामुळे तेथील स्थानीक नागरिकांसह स्थलांतरीच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रशियाकडून होत क्षेपणास्त्रांच्या (Missile) माऱ्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरांना मोठा फटका बसला आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरु असतानाच आज रशियाने खारकीव्ह शहरावर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी (Indian Student) ठार झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरद्वारे जाहीर केले.
याबाबतचे ट्विट भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी केले आहे. रशियाकडून झालेल्या गोळीबारात मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असून त्याचे जन्मस्थान कर्नाटकातील चलागेरी असून तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. भारतीय विद्यार्थी ठार झाल्यानंतर आता भारतातील विद्यार्थ्यांच्या नातेवाईंकामध्ये भीतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे अनेक नातेवाईक आणि कुटुंबीय केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना भारतात आणण्याची मागणी करत आहेत. ही परिस्थिती सुरु असतानाच भारतीय दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना शहर सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तिथे असणारे भारतीय नागरिक चिंताग्रस्त आहेत.
With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.
We convey our deepest condolences to the family.
— Arindam Bagchi (@MEAIndia) March 1, 2022
मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न
युक्रेनमधील खारकीव्ह शहरात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना जेव्हा परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला त्यावेळी नातेवाईकांना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली. त्याचा मृत्यू या हल्ल्यात कसा झाला आणि त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह भारतातील नातेवाईकांकडे देण्यात येईल का याबाबतही चौकशी केल्यानंतर त्याचा मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले. भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी ज्यावेळी परराष्ट्र खात्याशी संपर्क साधला त्यावेळी अधिकारी आणि नातेवाईक यांच्यामधील झालेला हा संवाद
नातेवाईकांचा दूतावासाबरोबरचा संवाद
नातेवाईक- सर मी नवीनचा चुलत भाऊ बोलतोय, आताच कळलं की एअरक्रॅशमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे?
विदेश मंत्रालय अधिकारी- एअरक्रॅशमध्ये नाही, त्यांचा मृत्यू गोळीबारात झाला आहे
तो किराणा खरेदीसाठी बाहेर पडला होता, त्यावेळी सुरु असेलल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहेत
तुम्हाला कन्नड कळतं की तामिळ?
नातेवाईक- मला कन्नड आणि इंग्रजी दोन्हीही कळतं
विदेश मंत्रालयाचा अधिकारी- तो किराणा खरेदी करत होता, त्यावेळी त्याला गोळी लागली. दुर्दैवाने यातच त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईक- त्याचा मृतदेह कुटुंबियांना दिला जाण्याची काही शक्यता आहे का?
विदेश मंत्रालयाचा अधिकारी- युद्धभूमीत त्याचा मृत्यू झाला आहे, हे तुम्ही समजून घ्या, आम्ही त्याचा मृतदेह शवागृहात ठेवला आहे. आमचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत की, त्याचा मृतदेह सुरक्षित ठेवला जावा, तितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर तो भारता आणला जाईल
नातेवाईक- सर खरंच 100 टक्के तुम्ही म्हणताय का, कि त्याचा मृत्यू झाला आहे?
अधिकारी- मला सांगायला अतिव दु:ख होतंय की, हे खरंय, विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनेही त्याच्या मृत्यू बातमीला दुजोरा दिला आहे, त्याच्या मित्रांनीही मृतदेहाची ओळख पटवली आहे. हो त्याचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या
Big Breaking : युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
युक्रेनमधून भारतात आलेले विद्यार्थी भावनिक, अनेकांच्या डोळ्यात पाणी; व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?