Imran Khan यांना का झाली अटक? पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा काय आहे आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली आहे. पाकिस्तानातील एका श्रीमंत व्यक्तीने काय केलेत त्यांच्यावर आरोप.

Imran Khan यांना का झाली अटक? पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा काय आहे आरोप
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 4:30 PM

मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक ( Imran Khan Arrested ) केली. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विट करून दावा केला आहे की, ते इम्रान खान यांचा छळ करत आहेत. ते इम्रान खानला ( Imran khan ) मारहाण करत आहेत. पीटीआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खानचे वकील इम्रान खान गंभीर जखमी झाल्याचा दावा करत आहेत.

इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटकेवर मात्र इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं न्यायाधीशांना म्हटलं आहे. कोर्टात हजर होण्यापूर्वीच इम्रान खान यांना अटक करण्यात आली. सरन्यायाधीशांनी आयजी इस्लामाबाद, गृह सचिव यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे कादिर ट्रस्ट प्रकरण?

हे  एकविद्यापीठाशी संबंधित प्रकरण आहे. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली होती. या प्रकरणाचा खुलासा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मलिक रियाझ यांनी केला आहे. इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी त्यांना धमकावून कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांच्या नावावर करून घेतल्याचा आरोप मलिक रियाझ यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित रियाझ आणि त्याच्या मुलीच्या संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. यामध्ये रियाझच्या मुलीने सांगितले की, इम्रानची पत्नी बुशरा बीबी सतत त्याच्याकडे पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत आहे.

इस्लामाबादमध्ये जमाव बंदी लागू

इस्लामाबाद पोलिसांनी राजधानी शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोणावरही अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर इम्रानच्या वकिलाने व्हिडिओ शेअर केला आहे. इम्रान खानच्या वकिलालाही मारहाण करण्यात आल्याचा दावा केला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मोठा जमाव आहे. इम्रान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयासमोर सांगितले होते. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. पण अखेर आज कोर्टात दाखल होण्यापूर्वीच अटक करण्यात आली.

पीटीआयच्या नेत्यांचा आरोप

इम्रान खान यांच्या अटकेवर पीटीआय नेते फवाद हुसैन यांनी ट्विट केले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे न्यायालयाच्या आवारातून अपहरण करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शेकडो वकील आणि सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार झाले आहेत. अज्ञात लोकांनी इम्रान खान यांना अज्ञात ठिकाणी नेले आहे. इम्रान खान यांला अटक केल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी गृह सचिव आणि आयजींना आदेश दिले आहेत की, पोलिसांनी १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहावे. इम्रान खान यांच्या अटकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.