अमेरिकेत मोठा ड्रामा, माजी राष्ट्रपती ट्रम्प यांची रवानगी थेट तुरुंगात; त्यानंतर 20 मिनिटांनी…

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. निवडणुकीत धांदली केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

अमेरिकेत मोठा ड्रामा, माजी राष्ट्रपती ट्रम्प यांची रवानगी थेट तुरुंगात; त्यानंतर 20 मिनिटांनी...
Donald TrumpImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 6:40 AM

जॉर्जिया | 25 ऑगस्ट 2023 : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणी अटलांटाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात आत्मसमर्पण केलं. ट्रम्प आत्मसमर्पण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आली होता. ट्रम्प तुरुंगात गेले. मात्र, त्यानंतर अवघ्या 20 मिनिटातच ते बाहेरही आले. त्यानंतर त्यांचा ताफा अटलांटाच्या हर्टसफिल्ड-जॅक्शन एअरपोर्टच्या दिशेने गेला. तिथे खासगी जेटने ते न्यूजर्सी गोल्फ क्लबला रवाना झाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: तुरुंगात शरणागती पत्करल्यानंतर शेरिफ ऑफिसमधून एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. ट्रम्प यांना औपचारिकरित्या अटक केल्याचं शेरिफ ऑफिसने म्हटलं आहे. ट्रम्प हे फुल्टन काऊंटी जेलमध्ये मग शॉटच्या प्रक्रियेतून जाण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

तुरुंगात पोहोचताच समर्थकांची गर्दी

ट्रम्प हे आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त पसरताच त्यांच्या समर्थकांना तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी केली. ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेचे झेंडे फडकवत त्यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी जॉर्जियाचे अमेरिकन प्रतिनिधी मार्जोरी टेलर ग्रीनही यावेळी उपस्थित होते. मार्जोरी हे ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी मानले जात आहेत.

सहकाऱ्याचं आत्मसमर्पण

ट्रम्प यांना जॉर्जियात 13 वेगवेळ्या प्रकरणांचा सामना करावा लागणार आहे. त्यात फसवणूक, खोट्या साक्षी देणं आदी अनेक आरोपांचा समावेश आहे. यापूर्वी ट्रम्प यांचे सहकारी मार्क मीडोज यांनीही फुल्टन काऊंटी तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार त्यांना अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण

मग शॉटचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेतील पहिले माजी राष्ट्रपती असतील. अमेरिकेच्या कायद्यानुसार, ज्याच्यावर आरोप आहे, अशा व्यक्तीचा पोलीस फोटो काढतात. त्याला मग शॉट असं म्हणतात. 2020मध्ये जॉर्जियात राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल बदलण्याचे षडयंत्र रचल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.

ट्रम्प समर्थकांचा दावा काय

आपल्या पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी नामांकन मिळवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू असतानाच हे प्रकरण बाहेर आलं आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण राजकारणाचा एक भाग आहे. ट्रम्प यांच्यावर राजकीय हेतूने आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या आधुनिक इतिहासासाठी आणि अमेरिकेच्या लोकशाहीसाठीची ही सर्वात घातक गोष्ट असल्याचं ट्रम्प समर्थकांनी म्हटलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.