Rudi Koertzen Death : कार अपघातामध्ये माजी अंपायर रुडी कोएर्टझेन यांचा मृत्यू, खेळाडूंकडून श्रद्धांजली
रुडी कोएर्टजेनच्या मुलाने नेमके घटना कशी घडली हे सांगितले आहे. कार अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. रुडी कोएर्टजेन हे त्यांच्या काही मित्रासोबत गोल्फ स्पर्धेत खेळायला गेले होते. सोमवारीच परत येईल अशी अपेक्षा होती. गोल्फची आणखी एक फेरी खेळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते एक दिवस उशीरा घरी परत येत होते असे त्यांच्या मुलाने सांगितले आहे.
मुंबई : दक्षिण अफ्रिकेचे माजी अंपायर रुडी कोएर्टजेन यांचे निधन झाले आहे. 73 वर्षीय रुडी कोएर्टझेनच्या मृत्यूचे कारण ठरले आहे ते (Car Accident) कारचा अपघात. अंम्पायर म्हणून त्यांचा नावलौकीक झाला होता. (Umpire) पंचाची भूमिका निभावताना त्यांची एक वेगळी स्टाईल होती. मात्र, स्थानिक बातम्यांच्या हवाल्यानुसार रुडी कॉएर्टझेन केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथे घरी परतत होते. दरम्यान, समोरून भरधावात येणाऱ्या वाहनाला (Accident) धडक बसली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून अपघात एवढा भीषण होता की यामध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वोत्तम अंम्पायरपैकी ते एक होते. त्यांच्या मृत्यूची बातमी येताच खेळाडूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुलाने सांगितली घटना
रुडी कोएर्टझेनच्या मुलाने नेमके घटना कशी घडली हे सांगितले आहे. कार अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. रुडी कोएर्टजेन हे त्यांच्या काही मित्रासोबत गोल्फ स्पर्धेत खेळायला गेले होते. सोमवारीच परत येईल अशी अपेक्षा होती. गोल्फची आणखी एक फेरी खेळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते एक दिवस उशीरा घरी परत येत होते असे त्यांच्या मुलाने सांगितले आहे.
विरेंद्र सेहवागचे ट्विट
रुडी कॉर्टझेन यांचे निधन झाल्याचे समजताच विरेंद्र सेहवागने ट्विट केले असून त्यामध्ये म्हणले आहे की, “रुडी कॉर्टझेनच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्याशी त्याचे चांगले संबध होते. जेव्हा मी जोरदार बॅटींग करायचो तेव्हा ते मला सांगायचे की व्यवस्थित आणि टिकून खेळ कारण त्यांना माझी बॅटींग अधिक काळ बघायची असत. “एकदा त्यांना आपल्या मुलासाठी क्रिकेट पॅडचा एक खास ब्रँड विकत घ्यायचा होता. त्यांनी मला त्याबद्दल विचारले. त्यामुळे मी त्यांना एक पॅड भेट म्हणून दिले ज्याबद्दल ते खूप आनंदी होते. एक सज्जन आणि एक अतिशय अद्भुत माणूस होते. रुडीला तुझी आठवण येईल.” अशा भावना सेहवाग याने व्यक्त केल्या आहेत. युवराज सिंह यानेही आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
अंपायरिंगचा असा होता विक्रम
रुडी कोएर्टझेनने 331 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाचे काम केले, यामध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 108 वेळा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 209 वेळा काम केले. इतकंच नाही तर रुडी कोएर्टझेन यांनी महिला टी-20 सामन्यातही पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.