माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करणार लाँच!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव 'ट्रुथ सोशल' असे ठेवण्यात आले आहे.
मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) असे ठेवण्यात आले आहे.
ट्रम्प म्हणतात की त्यांचा नवा प्लॅटफॉर्म तथाकथित उदारमतवादी मीडिया संस्थांचा प्रतिस्पर्धी असेल. ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ट्रुथ सोशल’ ची बीटा सिरीज नोव्हेंबरमध्ये लॉन्च होईल.
ट्रम्प यांचा नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) च्या मालकीचा असेल, जो “नॉन-वेक” एंटरटेनमेंट प्रोग्रामिंगचा समावेश असलेल्या डिमांड सेवेवर सबस्क्रिप्शन व्हिडिओ लॉन्च करेल, असं ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
“मी बिग टेकला सामोरे जाण्यासाठी ट्रुथ सोशल आणि टीएमटीजीची स्थापना केलेली आहे. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबानची ट्विटरवर मोठी हजेरी आहे, तरीही तुमच्या आवडत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शांत केले गेले आहे”, असंही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
(Former Us president Donald trump launch his own Social Media Platform Called truth Social)
हे ही वाचा :