बंगाली तरुणी, प्रेम आणि मुशर्रफ… परवेज मुशर्रफ यांची अधुरी प्रेम कहाणी माहीत आहे काय?
परवेज मुशर्रफ यांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या लव्ह स्टोरीचा उल्लेख केला आहे. ते एका बंगाली तरुणीच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे तिच्या घराच्या जवळच त्यांनी घर घेतलं होतं. ही तरुणी पूर्व पाकिस्तानात राहत होती.
कराची : प्रेम हे आंधळं असतं. त्यात जातपात, गरीब श्रीमंत असा भेद नसतो. प्रेम हे कुणावरही होतं. कोणत्याही वयात होतो. प्रत्येकजण कधी ना कधी तरी प्रेमाच्या झुळूकेने शहारून गेलेला असतोच. मग तो लष्कराचा प्रमुख का असेना… पाकिस्तानच्या लष्कराचे माजी प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ हे सुद्धा एकदा प्रेमात पडले होते. एका बंगाली तरुणीच्या ते प्रेमात पडले होते. मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘In the line of fire: A memoir’ या आत्मकथनात त्यांची ही लव्ह स्टोरी कथन केली आहे. मुशर्रफ यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रातील अनेक गोष्टींना उजाळा दिला जात आहे.
परवेज मुशर्रफ यांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या लव्ह स्टोरीचा उल्लेख केला आहे. ते एका बंगाली तरुणीच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे तिच्या घराच्या जवळच त्यांनी घर घेतलं होतं. ही तरुणी पूर्व पाकिस्तानात राहत होती. ती प्रचंड सुंदर होती. या मुलीला भेटण्यापूर्वी मुशर्रफ एका मुलीच्या प्रेमात पडले होते. पण या बंगाली तरुणीला पाहिल्यावर ते तिच्या प्रेमातच पडले.
लष्करात गेल्यावरही प्रेम कायम
मुशर्रफ पुढे पाकिस्तानी लष्करात सेकेंड लेफ्टनंट बनले. त्यानंतरही त्या मुलीवरील त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. सैन्यात काम करत असतानाही ते त्या मुलीच्या प्रेमात होते. त्याकाळी कराचीबद्दल त्यांना फारसं आकर्षण नव्हतं. पण त्यांची प्रेयसी तिथेच राहत होती. त्यामुळे ते कराचीला वारंवार जायचे. पण त्यांचं हे प्रेम अधिक काळ टिकू शकलं नाही. त्यांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली.
अचानक प्रेमभंग झाला
या तरुणीचं कुटुंब एक दिवस अचानक बांगलादेशला गेलं. त्यानंतर ही तरुणी मुशर्रफ यांना पुन्हा दिसली नाही. परंतु, आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ते या मुलीला विसरू शकले नव्हते. त्यानंतर त्यांनी अॅरेंज मॅरेज केलं. त्यांनी 1968मध्ये सेहबा यांच्याशी निकाह केला. त्यांना दोन मुले आहेत. मुशर्रफ हे पाकिस्तानचे निवृत्त जनरल होते. राजकारणी होते आणि पाकिस्तानचे दहावे राष्ट्रपती होते.
दुर्धर आजाराने ग्रस्त
मुशर्रफ यांच आज दुर्धर आजाराने निधन झालं. ते प्रदीर्घ आजारी होते. गेल्यावर्षी जून 2022मध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू होते. त्यांना एमाइलॉयडोसिस नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयव डॅमेज झाले होते. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008पर्यंत पाकिस्तानवर राज्य केलं होतं.