नोकरीची मस्त ऑफर, महिन्याभरात फक्त १० दिवस काम, १५ लाख पगार अन् भरभक्कम बोनस
Job Alert : सध्या एका नोकरीच्या जाहिरातीची चर्चा चांगलीच सुरु आहे. या नोकरीसाठी फक्त दहा दिवस काम आहे आणि २० दिवस सुट्या आहेत. पॅकेज भरभक्कम म्हणजे म्हणजेच कोटीमध्ये आहे. सोबत बोनसही असणार आहे. ही जाहिरात एका लेखकाने टि्वट केलीय.
कॅनबेरा : आपण नेहमी सरकारी नोकरी शोधत असतो. कारण पगार चांगला आणि भरपूर सुट्या. त्यामुळे अनेक प्रयत्न करुन सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सर्वांकडून केला जातो. मग सरकारी नोकरीसारखी नव्हे तर त्यापेक्षा चांगली ऑफर मिळाली तर कोणाला नको असणार? सध्या अशीच एका ऑफरची जाहिरात आली आहे. त्या जाहिरातीनुसार आठवड्याला फक्त 10 दिवस काम करायचे अन् 20 दिवस सुट्टी घ्यायची. पगार मात्र पूर्ण महिन्याचा. हा पगारही कमी नाही. 15 लाख 60 हजार रुपये पगार मिळणार आहे. फक्त इतकेच नाही तर भरभक्कम बोनस सुद्ध मिळणार आहे. मग अशी नोकरी कोणाला नको असणार?
कुठे आली जाहिरात
ब्रिटिश मेडिकल जर्नलने ऑस्ट्रेलियात ज्युनियर डॉक्टरच्या पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीचे ट्टिट लेखक ॲडम के यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. यामध्ये कनिष्ठ डॉक्टरांना भरमसाठ पगार आणि दर महिन्याला 20 दिवस रजेचे आमिष दाखवण्यात आले आहे. ब्लागीबोन मेडिकल रिक्रूटमेंटची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की, येथील डॉक्टरांना एका महिन्यात 10 शिफ्टमध्ये काम करावे लागेल आणि ते उर्वरित 20 दिवस प्रवास, पोहणे आणि सन सर्फिंगसाठी सुट्टी घेऊ शकतात.
काय आहे पगार
इतकंच नाही तर जाहिरातीत 240,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.3 कोटी रुपये) वार्षिक पगार दिला आहे. म्हणजे महिन्याला हा पगार 15 लाख 60 हजार रुपये जातो. राहण्यासाठी घर आणि 2.7 लाखांचा साइन-इन बोनस देण्यात येणार आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) च्या करिअर वेबसाइटवर ही जाहिरात देण्यात आली आहे.
How depressing to see this in the BMJ. It’s hard to say those figures don’t present a compelling argument. It all leads to a big question for the govt: if you don’t address doctors’ very reasonable pay concerns, alongside their conditions and wellbeing, guess where they’re going? pic.twitter.com/24oKKrgfLa
— Adam Kay (@amateuradam) May 3, 2023
काय आहे संदर्भ
इंडिपेंडंट न्यूजनुसार, जाहिरात ॲडम के यांच्या NHS मध्ये कनिष्ठ डॉक्टर म्हणून त्यांच्या अनुभवांबद्दलच्या सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकाचा संदर्भ आहे. ब्रिस्बेनमधील BMJ वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहिरातीत एका वर्षासाठी प्रति शिफ्ट रु. 1 लाख, तसेच 12 महिन्यांनंतर वेगळा बोनस देण्याचे वचन दिले होते.
लेखक नाराज
जाहिरातीचे प्रत शेअर करताना लेखक अॅडम के यांनी लिहिले की, BMJ ची ही जाहिरात पाहून खूप निराश झाला आहे. या प्रकारामुळे सरकारवर प्रश्न निर्माण होत आहेत. जर तुम्ही डॉक्टरांना योग्य वेतन आणि सवलती दिल्या नाही तर कल्पना करा की आम्ही कुठे जात आहोत.