तुम्हाला अ‍ॅलर्जी आहे? तर मग कोरोना लसीवरची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी!

कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक जारी करत नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे (Canada warns allergic people against Pfizer). 

तुम्हाला अ‍ॅलर्जी आहे? तर मग कोरोना लसीवरची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी!
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 10:25 PM

ओटावा : कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे. ज्या रुग्णांना औषध किंवा कुठल्याही खाद्य पदार्थ्यांची अ‍ॅलर्जी असेल, त्यांनी फायजर कंपनीची लस घेऊ नये, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक जारी करत नागरिकांना लसीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे (Canada warns allergic people against Pfizer).

“ब्रिटनमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट आढळले त्यांना औषधांची अ‍ॅलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असेल अशा रुग्णांनी शक्यतो लस घेऊ नये”, असं कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकात म्हटलं आहे.

“आरोग्य मंत्रालयाने उपलब्ध पुराव्यांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार सध्याचे आरोग्यविषयक गाईडलाईन्स योग्य आहेत, अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. जर लसीबाबत काही नवी तक्रार आढळल्यास योग्य निर्णय घेण्यात येईल”, असं पत्रकात म्हटलं आहे. ज्या लोकांना एलर्जीची समस्या आहे त्यांनी औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंदेखील पत्रकात म्हटलं आहे.

कॅनडात लसीकरणाला सुरुवात

ब्रिटन पाठोपाठ कॅनडातही कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत देशात जवळपास अडीच लाख लसी कंपनीकडून प्राप्त होतील. यापैकी सव्वा लाख लोकांना या महिन्यात लस देण्याचं ध्येय असल्याची अशी माहिती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी 9 डिसेंबरला दिली होती.

फायजर कंपनीची कोरोना लस घेतल्यानंतर दोन रुग्णांना अ‍ॅलर्जीचा त्रास

कोरोना विषाणूवर लस तयार करणाऱ्या अमेरिकेच्या फायजर कंपनीने मागील काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही नागरिकांना अ‍ॅलर्जीचा त्रास होत असल्याचं समोर आलं. यानंतर फायजरने ज्या नागरिकांना खाद्य पदार्थ किंवा लसीची अ‍ॅलर्जीची पार्श्वभूमी आहे त्यांना ही लस न देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या या लसींमुळे जग कोरोनावर मात करु शकते अशी आशा तयार झाली होती. मात्र, कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांकडे पाहता चिंता वाढली आहे.

तरुणांमध्ये लसीचे सर्वाधिक दुष्परिणाम

फायजरची लस एमआरएनएवर ( mRNA) आधारित आहे. एमआरएनए लस मानवी शरीरात इंजेक्ट केली जाते. ही लस शरीरातील इम्यून सिस्टमला कोरोना विषाणूशी लडण्यासाठी तयार करते. या लसीमुळे अँटीबॉडी तयार होतात आणि टी-सेल सक्रीय होऊन संसर्ग झालेल्या सेल नष्ट करण्याचं काम करतात. फायजरने 40 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांना 3 टप्प्यातील चाचणीत सहभागी करुन घेतलं होतं.

या चाचणीतही काही प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांना लस घेतल्यानंतर इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी त्रास झाल्याचं समोर आलं होतं. अनेक लोकांनी थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी होत असल्याचंही म्हटलं होतं. काही लोकांना लिम्फ नोड्समध्ये सूज आल्याचंही दिसलं.

फायजरचे दुष्परिणाम

फायजर लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अनेक देशांनी परवानगी दिली आहे. मात्र, एफडीएने दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या सुरुवातीच्या चाचणीत 4 जणांना ‘बेल्स पाल्सी’ (अर्धांगवायू/पॅरालिसीस) झाल्याचं समोर आलं होतं. या अवस्थेत अर्ध्या चेहऱ्याचे स्नायू निकामी होतात. असं असलं तरी हे अगदी काही वेळेसाठी होतं आणि पुन्हा शरीर सामान्य होतं. हे कशामुळे होतं याचं अद्याप निश्चित कारण समजू शकलेलं नाही. सर्व डॉक्टरांना लसीकरणानंतर काय दुष्परिणाम होतात याचं निरिक्षण करण्यास सांगितलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.