Home offer: 6 कोटींचे घर फक्त 103 रुपयाला, काय आणि कोणासाठी आहे ही ऑफर जाणून घ्या

Home Offer : देशात खूप कमी वेळा असे होते की, स्वस्तात घरे उपलब्ध करुन दिली जातात. अनेक जण यासाठी अर्ज करतात. पण नशीबवान व्यक्तीलाच ही घरे मिळतात. आता तर फक्त १०३ रुपयात घर उपलब्ध करुन दिले गेले आहे. कुठे आहे ही ऑफर आणि कोणासाठी आहे. जाणून घ्या.

Home offer: 6 कोटींचे घर फक्त 103 रुपयाला, काय आणि कोणासाठी आहे ही ऑफर जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 3:15 PM

Home Offer : घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. देशात जर घराच्या किंमत पाहिल्या तर लाखो रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंत किंमती आहेत. अशा स्थितीत मध्यमवर्गीयांना स्वतःचे घर घेणे आज सहज सोपे नाही. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये तर घरे कोटींच्या घरात आहेत. पण अशी एक जागा आहे जिथे 6.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरे केवळ 103 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. ही स्वस्त घरं कुठे उपलब्ध आहेत आणि कोण विकत घेऊ शकतात याबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.

6 कोटींचे घर 100 रुपयांना का विकले जात आहे?

कॉर्निश टाऊन सेंटरची कॉर्नवॉल कौन्सिल करोडो रुपयांची घरे इतकी स्वस्त बनवण्याचे काम करत आहे. अशी ऑफर फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना घर नसल्याने ते अडचणीत आहेत. अशा लोकांच्या मदतीसाठी ही संस्था पुढे आली आहे आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे देऊ करत आहे. ही घरे जितकी सुंदर आहेत तितक्याच स्वस्त दरातही उपलब्ध आहेत. या ऑफरनंतर संपूर्ण देशात ही घरे खरेदी करण्याची शर्यत लागली आहे. पण प्रत्येकाला ही घरं विकत घेता येणार नाही.

घरे कुठे आणि किती स्वस्तात मिळतील?

ही ऑफर आपल्या भारतात उपलब्ध नाही. ही ऑफर इंग्लंडमध्ये सुरू आहे. अशी स्वस्त घरे उपलब्ध करून दिली जात आहेत, ज्याची किंमत फक्त 103 रुपये आहे. म्हणजे अवघ्या एक पौंडात इंग्लंडमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या घरांची किंमत 6.6 कोटी रुपये आहे.

100 रुपयांना किती घरे?

इंग्लंडमध्ये 11 घरे ही 103 रुपयांना मिळणार आहेत. कॉर्नवॉल कौन्सिल ही घरे लोकांना उपलब्ध करून देत आहे. हे सर्व 11 तटरक्षक दलाचे फ्लॅट थ्री सीज कम्युनिटी लँड ट्रस्टला देण्यात आले आहेत. अध्यक्ष डेव्हिड यांनी सांगितले की, ही सर्व घरे खुल्या बाजारात विकली जाणार नाहीत. या ऑफरचा उद्देश फक्त मदत करणे आणि प्रत्येकाला घर उपलब्ध करून देणे हा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.