इस्रायल, इराणनंतर आता फ्रान्सचीही एन्ट्री… पाकिस्तानवर महासंकट, समुद्रातूनही होणार हल्ला; कोणती डील डन?
भारताने फ्रान्सकडून 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी केली आहेत, ज्यामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या कराराने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. राफेल-एमची अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे समुद्री सुरक्षा आणि गुप्तचर मोहिमा अधिक प्रभावी होतील.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्याने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर भारताने पाकिस्तानचं पाणीच तोडल्याने त्याचा थेट परिणाम पाकिस्तानातील 17 कोटी लोकांवर होणार आहे. त्यामुळेही पाकच्या तोंडचं पाणी पळालं आहे. दुसरीकडे अमेरिका, इराण आणि इस्रायलने भारताला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. आता यात आणखी एका देशाची एन्ट्री झाली आहे. तो म्हणजे फ्रान्स. भारत आणि फ्रान्स दरम्यान 26 राफेल मरीन विमानांची डील झाली आहे. 63,000 कोटी रुपयांची ही डील झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला कापरं भरलं आहे.
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या डीलनुसार भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल मरीन एअरक्राफ्ट खरेदी केले जाणार आहेत. भारताचे प्रतिनिधी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी हा सौदा केला आहे. यावेळी नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल के. स्वामिनाथन उपस्थित होते.
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार 22 सिंगल-सीट आणि 4 ट्विन-सीट विमान सामिल होणार आहेत. यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे. कारण हे जेट आयएनएस विक्रांतवर तैनात केले जाणार आहेत. 1971 च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानला आस्मान दाखवलं होतं. या जेटमुळे आता भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.
भारत आणि फ्रान्स दरम्यान 2016मध्ये डील झाली होती. त्यानुसार आधीपासूनच भारतीय नौदलाच्या ताफ्यात 36 एअरक्राफ्ट आहेत. भारतीय हवाई दलाच्या राफेल जेट अंबाला आणि हाशिनारा या दोन बेसवरून ते ऑपरेट होतील. या 26 राफेल-M च्या डीलसोबतच भारताच्या राफेल जेटची संख्या वाढून 62 होणार आहे.
कसा आहे Rafale-M फायटर जेट?
Rafale-M एक मल्टीरोल फायटर जेट आहे. त्याचा AESA राडार टारगेट डिटेक्शन आणि ट्रॅकिंगसाठी उत्तम आहे. यात स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टिम आहे, ती स्टेल्थ बनवते. यात हवेतच इंधन भरता येते, म्हणजेच याची रेंज वाढू शकते. राफेल-एम फायटर आल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात नजर ठेवणे, गुप्तचर मोहीम राबवणे आणि हल्ले करणे अशा अनेक मोहिमा शक्य होतील. हा फायटर जेट अँटी-शिप वॉरफेअरसाठी सर्वोत्तम आहे. यात प्रिसिजन गाइडेड बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे बसवता येतात, जसे की मेटियोर, स्काल्प किंवा एक्सोसैट. या फायटर जेटच्या आगमनामुळे आकाश, समुद्र आणि जमीन — तिन्ही ठिकाणी संरक्षण मिळेल. नौदल देशाच्या चहुबाजूंना अदृश्य कवच तयार करू शकेल.
