Rahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले
Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताबाबतचं जे व्हिजन तयार केलं आहे. ते सर्वसमावेशक नाही. त्यांच्या व्हिजनात देशातील अर्ध्या लोकांना स्थान नाही. हे चुकीचं आहे आणि ते भारताच्या विरोधी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
लंडन: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या लंडनच्या दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात त्यांनी भाग घेऊन केंद्रातील मोदी (pm modi) सरकारवर हल्लाबोल केला. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. केंब्रिज विद्यापीठात (Cambridge) राहुल गांधी भाषण करत असतानाच एका भारतीय अधिकाऱ्याने त्यांना मध्येच टोकलं. यावेळी या भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधी यांना देश, भारत आणि चाणक्यांच्या राष्ट्रधर्माचा धडाच ऐकवला. तुमचे भारताविषयचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक आहेत, अशा शब्दात या अधिकाऱ्याने राहुल गांधी यांना फटकारले आहे. या अधिकाऱ्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. केंब्रिजमध्ये आयडियाज फॉर इंडिया संमेलन सुरू आहे. त्यात राहुल गांधींना भाग घेतला. सोमवारी केंब्रिज विद्यापीठात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातही त्यांनी भाग घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Yesterday, in Cambridge, I questioned Mr. Rahul Gandhi on his statement that “India is not a nation but a Union of States”. He asserted that India is not a nation but the result of negotiation between states. (His complete response will be shared once uploaded by organisers) pic.twitter.com/q5KluwenMf
— Siddhartha Verma (@Sid_IRTS) May 24, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताबाबतचं जे व्हिजन तयार केलं आहे. ते सर्वसमावेशक नाही. त्यांच्या व्हिजनात देशातील अर्ध्या लोकांना स्थान नाही. हे चुकीचं आहे आणि ते भारताच्या विरोधी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. कॉरपस क्रिस्टी महाविद्यालयात इंडिया अॅट 75 या कार्यक्रमालाही राहुल गांधींनी संबोधित केलं. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी हिंदू राष्ट्रवाद, काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबीयांची भूमिका याची माहिती दिली. तसेच देशातील लोकांना संघटीत करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.
कोण आहेत सिद्धार्थ वर्मा?
सिद्धार्थ वर्मा हे भारतीय नागरी सेवेत अधिकारी पदावर आहेत. ते रेल्वेत कार्यकरत आहेत. वर्मा सध्या केंब्रिज विद्यापीठात पब्लिक पोलीस या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील प्रश्नांना उत्तर दिलं आहे.
भारत हे एक राष्ट्रच
तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद 1 चा उल्लेख केला. भारत, राज्यांचा एक संघ आहे. पण तुम्ही संविधानाचं मागचं पान उलटून पाहिलं तर त्यातील प्रस्तावनेत भारत एक राष्ट्र असल्याचा उल्लेख आहे. भारत जगातील सर्वात पुरातन जिवंत सभ्यतेंपैकी एक आहे. राष्ट्र शब्द वेदांमध्येही आहे. आपल्याकडे प्राचीन सभ्यता आहे. चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीटात विद्यार्थांना शिकवलं. तेव्हा त्यांनी, आपण विविध संघराज्यात राहत आहोत. पण शेवटी आपण एक राष्ट्र आहोत. तोच भारत आहे, असं स्पष्ट केलं होतं. वर्मा यांनी आपला हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी संविधान आणि चाणक्यांचे विचार ऐकवून राहुल गांधी यांना फटकारले आहे.