भारतीय वंशाचे तुलसी गबार्ड यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी, अमेरिकेचे हेरखातेच तुलसी यांच्या हातात

Who is Tulsi Gabbard?: डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर महत्वाच्या नियुक्तीमध्ये भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे नेतृत्व दिले आहे. ते एका बायोटेक उद्योजक आहेत.

भारतीय वंशाचे तुलसी गबार्ड यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी, अमेरिकेचे हेरखातेच तुलसी यांच्या हातात
tulsi-gabbard
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 3:04 PM

 Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांची निवड झाली. ते 20 जानेवारी रोजी पदाची सूत्र हाती घेणार आहे. त्यापूर्वी त्यांनी महत्वाच्या नियुक्त्या करण्याचे काम सुरु केले आहे. ट्रम्प यांनी आपली नवीन टीम गठीत करण्याचे काम सुरु केले आहे. या टीमममध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांना महत्वाची जबाबदाऱ्या दिल्या आहेत. भारतीय वंशाचे उद्योजक-राजकारणी विवेक रामास्वामी यांच्यावर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे (DoGE) नेतृत्व दिले आहे. ते सरकारी खर्चावर सर्व लक्ष ठेवणार आहेत. तसेच आता अमेरिकेतील हेरखातेही भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हातात दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालकपदावर भारतवंशी तुलसी गबार्ड यांची नियुक्ती केली आहे. तुलसी गबार्ड पूर्वी काँग्रेस सदस्य होत्या. त्यांना अमेरिकेची पहिली हिंदू काँग्रेस वूमन म्हटले जाते.

कोण आहे तुलसी गबार्ड

तुलसी गबार्ड या केवळ राजकारणीच नाही तर माजी सैनिकही आहेत. त्यांना मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील युद्धक्षेत्रात तैनात करण्यात आले आहे. त्यांचा लष्करी अनुभवामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षेची महत्वाची जबाबदारी दिली गेली आहे. काही काळापूर्वी तुलसी यांनी डेमोक्रॅटिक पक्षापासून वेगळे होऊन रिपब्लिकन पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पक्ष बदलाचा हा प्रवास चर्चेचा विषय ठरला होता. 2022 मध्ये डेमोक्रॅट पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय भूमिकेला नवी दिशा दिली.

राष्ट्राध्यपक्षपदाच्या शर्यतीत

2019 मध्ये तुलसी यांनी डेमोक्रेटिक राष्ट्राध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीतील चर्चेत कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. परंतु राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत त्या मागे राहिल्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा एक महत्वाचा भाग होता. तुलसी गबार्ड यांचा भारतीय धर्म आणि संस्कृतीशी खोलवर संबंध आहे. त्यांची आई भारतीय आहे. त्यांची हिंदू धर्माबाबत असलेली आवड लक्षात घेऊन त्यांनी मुलीचे नाव तुलसी ठेवले. तुलसी गबार्डला यांना त्यांच्या भारतीय वंशाचा नेहमीच अभिमान वाटतो.

हे सुद्धा वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर महत्वाच्या नियुक्तीमध्ये भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे नेतृत्व दिले आहे. ते एका बायोटेक उद्योजक आहेत. त्यांच्याकडे सरकारी अनुभव नसला तरी कॉरपोरेट क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.