न नतांज, न फोर्डो…, अमेरिका-इस्त्रायलला चकमा देत इराणने या ठिकाणी बनवला सीक्रेट न्यूक्लियर अड्डा!
अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी फोर्डो अणू प्रकल्प केंद्रांबाहेर १६ ट्रकांची रांग दिसली होती. इराण अणू प्रकल्पाशी निगडीत एका अधिकाऱ्याने टेलिग्राफला सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणने आपला समृद्ध युरेनियमचा साठा सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे.

अमेरिकन विमान B-2 बॉम्बरने इराणचे सर्वात सुरक्षित असलेली फोर्डो अणू केंद्र नष्ट केले, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जून रोजी केला होता. तसेच नतांज आणि इस्फहान अणू प्रकल्पही उद्ध्वस्त केल्याचे म्हटले होते. परंतु इराणने या हल्ल्यापूर्वीच युरेनियम फोर्डमधून दुसऱ्या ठिकाणी हलवल्याचे म्हटले आहे.
हा शब्द आला चर्चेत
अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर कुह-ए-कोलांग गज-ला हा शब्द चर्चेत आला. या कुह-ए-कोलांग गज-लाच्या पहाडांमध्ये इराणने अमेरिकन हल्ल्यापूर्वी युरेनियम लपवून ठेवल्याचे म्हटले जात आहे. द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय अणूउर्जा आयोगाचे महानिर्देशक राफेल ग्रॉसी यांनी इराणला कुह-ए-कोलांग गज-लाच्या पहाडांखाली काय आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर इराणने सडेतोड उत्तर देत म्हणाले, तुम्हाला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही.
हल्ल्यापूर्वीच युरेनियम सुरक्षित ठिकाणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केल्यानंतर त्यांचे सर्व अणू उर्जा प्रकल्प नष्ट केल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांच्या या दाव्यावर इराणने म्हटले होते की, आमचे युरेनियम सुरक्षित आहे. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी फोर्डो अणू प्रकल्प केंद्रांबाहेर १६ ट्रकांची रांग दिसली होती. इराण अणू प्रकल्पाशी निगडीत एका अधिकाऱ्याने टेलिग्राफला सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणने आपला समृद्ध युरेनियमचा साठा सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे.
रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, इराणने कुह-ए-कोलांग गज-ला किंवा पिकैक्स माउंटेनमध्ये युरेनियम ठेवला आहे. तसेच काही रिपोर्टमध्ये तेहरानमधील शेकडो गुप्तस्थळी युरेनियम ठेवल्याचे म्हटले आहे. इराणचा नवीन अणू उर्जा प्रकल्प पिकैक्स माउंटेनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ते तेहरानच्या दक्षिणेकडे जवळपास 225 किलोमीटर लांबीवर आहे. तसेच फोर्डोच्या दक्षिणेत 90 किलोमीटरवर आहे. परंतु नतांजपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. एपीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफरेशन स्टडीजकडून संशोधन झाले. त्या संशोधनात पहाडांच्या खाली चार भुयार खोदल्याचे म्हटले आहे. त्यातील दोन पूर्वीकडे आणि दोन पश्चिमेकडे आहे. सहा मीटर लांब आणि ८ मीटर उंच हे भुयार आहे.
